Type to search

जळगाव

जळगावात पाऊस आला पण, फक्त 20 मिनिटे

Share

जळगाव । अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर जळगावात गुरुवारी रात्री 9.45 वाजेच्या सुमारास काही भागात जोरदार तर काही भागात तुरळक पावसाने हजेरी लावली. जवळपास 20 मिनीट पाऊस सुरु असल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. नेहमीप्रमाणे पाऊस सुरु झाल्याने शहरातील बर्‍याशा भागांमधील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे महावितरणाच्या मान्सूनपूर्व नियोजनाचा पहिल्याच पावसात फज्जा उडाला.

जळगावात गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे नागरिक सुखावले आहे. यंदा पावसाने जळगावकरांनी चांगलीच प्रतिक्षा करायला लावली. जून महिन्याचे 13 दिवस उलटून देखील पावसाचे आगमन झाले नसल्याने शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांच्या चिंता वाढल्या होत्या. उकाड्याने नागरिक चांगलेच हैराण झाले होते. गेल्या दोन दिवसांपूर्वी सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण होत होते. परंतु पाऊस येत नव्हता. गुरुवारी रात्री अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पहिल्याच पावसामुळे नेहमीप्रमाणे जळगाव शहरातील बर्‍याचशा भागांमधील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. पाऊस सुरु होताच वादळ नसतानाही अर्ध जळगाव शहर अंधारात होते. काही भागात झाडांच्या कोरड्या फांदया वायरींवर कोसळल्या होत्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!