पुजार्‍याच्या दुचाकीची अज्ञातांकडून जाळपोळ

0
जळगाव । दि.20 । प्रतिनिधी-शाहुनगरातील दक्षिणमुखी तपस्वी हनुमान मंदिरातील पुजार्‍याची मंदिरासमोर उभी असलेली मोटारसायकल अज्ञातांने मध्यरात्री जाळून नुकसान केल्याची घटना आज सकाळी 5 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
दरम्यान याप्रकरणी पुजार्‍याच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रामबालकदास सरजुदास त्यागी वय 27 वर्ष हे गेल्या 12 -13 वर्षापासून शाहूनगरातील तपास्वी हनुमान मंदिरात पुजारी आहेत.

तसेच ते जवळच असलेल्या गोशाळेची देखभाल करतात. मंदिराच्या ट्रस्टतर्फे निमखेडी येथील देखील गोशाळा बांधण्यात आली असून पुजारी त्या ठिकाणी देखील देखभाल करतात.

रात्री पुजारी निमखेडी शिवारातील गोशाळेतून आपल्या मोटारसायकल क्रमांक एमएच 19 सीजी 2214 ने शाहुनगरातील मंदिरात आले.

यावेळी त्यांनी आपली दुचाकी घराबाहेर उभी केली. त्यानंतर निमखेडी येथील गो-शाळेतील गायीला वासरु होणार असल्याने पुजारी रामबालकदास हे रात्री घोडयावर बसून गोशाळेकडे निघून गेले.

याचाच फायदा घेवून काही अज्ञातांनी त्यांच्या दुचाकीवर पेट्रोल टाकून जाळून टाकली. सकाळी 4.30 वाजेच्या सुमारासत पुजारी रामबालकदास हे निमखेडी येथून घरी शाहुनगरात पोहचल्यानंतर त्यांना त्यांची दुचाकी जळून खाक झाल्याचे दिसून आले.

त्यांनी लागलीच मंदिरातील अन्य पुजारींना घटनेची माहिती दिली. दरम्यान रामबालकदास पुजारी यांनी शहर पोलिस स्टेशनला येवून अज्ञात व्यक्तींने मोटारसायकलीचे जाळून नुकसान केल्याची तक्रार दिली.

पुजारी रामबालकदास यांच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरुध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

*