Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव राजकीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा स्थळाचा एनएसजी पथकाने घेतला ताबा

Share

जळगाव / प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन रविवार, दि.१३ रोजी जळगावात करण्यात आले आहे. या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. या सभेसाठी औरंगाबाद रस्त्यावरील विमानतळाच्या समोरील मोकळ्या पटांगणात भव्य मंडप तसेच व्यासपीठ उभारण्यात आले आहे.

सभा स्थळाचा ताबा शनिवारीच दिल्लीच्या एनएसजी पथकाने घेतला आहे. सभा स्थळाभोवती एनएसजी कमांडोजची सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

या सभेसाठी तगडा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. सभा स्थळाकडे येणार्‍या रस्त्यांची डागडुजी व विविध ठिकाणी वाहनतळ उभारण्यात आले आहेत.

विधानसभा निवडणुकीनिमित्त पंतप्रधान मोदी यांची जळगावात पहिलीच सभा रविवारी होत आहे. या पार्श्वभूमीवर जंगी तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप अधिकृत दौरा आलेला नसला तरी नियोजित कार्यक्रमानुसार मोदी यांचे आगमन सकाळी ११ वाजेच्या सुमारास विशेष विमानाने जळगाव विमानतळावर होईल.

त्यानंतर तेथे विशेष पोलीस ताफ्यात विमानतळाच्या समोरच असलेल्या सभा स्थळी येतील. विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. एनएसीजी तसेच महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!