Type to search

आवर्जून वाचाच जळगाव राजकीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जळगावात चौथ्यांदा आगमन

Share
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव ट्विट; 'यंदा होळी खेळणार नाहीत' Latest News Mumbai Prime Minister Narendra Modi Will not Play Holi this Time

राजेंद्र पाटील
जळगाव ।

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवार, दि.13 ऑक्टोंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी येत असून त्यांच्या सभेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. यासाठी भाजपचे खासदार, आमदारांसह सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते व जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जळगावात दुसर्‍यांदा सभा होत असली तरी यापुर्वी दोन वेळा पंतप्रधान श्री. मोदी यांनी जळगाव विमानतळावर थांबून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची भेट घेतली होती.

पंतप्रधानांच्या आगमनाची घटिका समीप येत असल्याने सभेची जय्यत तयारी सुरू असून पदावर असलेले खासदार, आमदारांसह येत्या विधानसभा निवडणूकीसाठी उभे असलेले उमेदवार, कार्यकर्ते यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. पुर्वी पंतप्रधानांना जवळून पाहण्याची संधी मोजक्याच लोकांना मिळत होती. मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांच्या भारतासह देश-विदेशातही अनेक सभा, भाषणे होतांना आपण बघतोच त्यावेळी सुध्दा पंतप्रधान मोदी त्याठिकाणी उपस्थित नागरीकांशी जवळून संवाद साधत असतात, हस्तांदोलन करताना दिसतात. ही संधी जळगावकरांसाठी दुसर्‍यांदा चालुन आली आहे. महाराष्ट्र राज्यात भाजप-शिवसेना युतीच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या उमेदवारांच्या प्रचार सभेसाठी स्टार प्रचारक म्हणून येत असले तरी ते आज भारताचे पंतप्रधान आहेत हे आपल्याला विसरून चालणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुसर्‍यांदा जळगावात सभा होत असली तरी याठिकाणी त्यांचे चौथ्यांदा आगमन होत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारा दरम्यान मध्यप्रदेशातील कुक्षी येथील प्रचारसभा आटोपून नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टरने जळगाव विमानतळावर आगमन झाले होते. यावेळी तत्कालीन विरोधीपक्षनेते एकनाथराव खडसे यांनी त्यांचे स्वागत केले होते. यानंतर ते तामिळनाडूला प्रचारसभेसाठी विमानाने रवाना झाले होते. यानंतर दि.20 एप्रिल 2014 रोजी जळगावात प्रथमच श्री.मोदी यांची सभा झाली होती.

काही महिन्यांपुर्वीच धुळे येथील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले होते. याप्रसंगी त्यांचे स्वागतासाठी महापौर सीमा भोळे, आ.सुरेश भोळे, आ.स्मिता वाघ, जि.प.अध्यक्षा ना.उज्वला पाटील, जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, पोलीस अधिक्षक दत्ता शिंदे आदी उपस्थित होते. याप्रसंगी पंतप्रधानांना महापौर सीमा भोळे यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या हिंदी आवृत्तीचे पुस्तक भेट देवून त्यांचे स्वागत केले होते.

स्वागताचा व्हीडीओ आला होता चर्चेत
पंतप्रधानांच्या आगमानानिमित्त सुरक्षेच्या दृष्टीने मोठी तयारी केली होती. पोलिसांचा मोठा ताफा, वायुसेना, स्थलसेना यांची हेलिकॉप्टरही विमानतळावर तैनात होती. अग्निशमन दलाचे बंब, रूग्णवाहिका, वैद्यकीय पथक अशी सर्व सुरक्षेची तयारी केली असतानाही त्यावेळेच्या स्वागताचा व्हीडीओ व्हायरल झाल्याने सुरक्षेचा गलथानपणा उघड झाला होता.
उद्या होणार्‍या सभेच्या तयारीसाठी जिल्हा प्रशासनासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कंबर कसले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने का होईना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जळगावात चौथ्यांदा आगमन होणार असून जळगाव जिल्हा वासियांना पंतप्रधानांना जवळून भेटण्याची (बघण्याची) त्यांचे भाषण ऐकण्याची संधी चालून आली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!