Type to search

maharashtra जळगाव

प्रेसिडेंट हॉटेलमध्ये शिरुन चोरट्यांनी वर्‍हाडाच्या दागिन्यांवर मारला डल्ला

Share
जळगाव । शहरातील एमआयडीसी परिसरात, पोलीस ठाण्याला लागूनच असलेल्या प्रेसिडेंट हॉटेलमध्ये शिरुन चोरट्यांनी लग्नसमारंभासाठी उपस्थित वर्‍हाडाच्या दागिन्यांवरच डल्ला मारला. डोबिंवलीच्या शीतल भावेश शहा यांच्या हॅण्डबॅगमधून 1 लाख 64 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. या बॅगेत के्रडीट, डेबीट कार्ड, ड्राईव्हींग लायन्सस असे महत्वाचे कागदपत्रेही होते. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रविवारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी घटनेच्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज हॉटेल व्यवस्थापकाकडून मागविले आहे.

मोहाडी रोडवर राहणारे मामा केशरसिंग राजपूत यांचा मुलगा स्वरुपसिंग याच्या विवाहासाठी शीतल शहा ह्या पतीसह जळगावी आल्या होत्या. हॉटेल प्रेसिडंट येथे शुक्रवारी, दि. 8 रोजी विवाह होता. सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास वरात हॉटेलमध्ये आली. त्यानंतर विवाहसोहळा पार पडला. याचवेळी शीतल शहा व त्यांचे पती यांना त्यांच्या मामी नंदाबाई यांनी स्टेजवर बोलविले. त्यावेळी शहा यांनी त्यांच्याजवळील बॅग नवरदेवाच्या शेजारील खुर्चीजवळ ठेवली. शहा व त्यांच्या बहिणींनी नवरदेव स्वरुपसिंगला भेटवस्तू व पाकीट दिले. स्टेजवरुन उतरल्यानंतर शहा यांना खुर्चीजवळ ठेवलेली बॅग दिसून आली नाही. त्यामुळे बॅगबाबत त्यांनी सर्वांना विचारणा केली.

बॅगमधून 1 लाख 64 हजारांचे सोन्याचे दागिन केले लंपास

शीतल शहा यांची बॅग क्षणातच हॉटेलमध्ये शिरलेल्या चोरटट्याने लंपास केली. या बॅगमध्ये 30 हजार रुपये किंमतीचे 15 गॅ्रम वजनाचे सोन्याचे कडे, 30 हजार रुपये किंमतीच्या 15 ग्रॅम वजनाच्या हेअररिंग, 30 हजार रुपयांचे 15 ग्रॅमचे मंगळसुत्र, 10 हजार रुपयांचा कॅसीओ कंपनीचा स्टील बेल्ट, 30 हजार रुपयांचा अ‍ॅपल केंपनीचा मोबाईल, 4 हजार रुपये किंमतीचा गॉगल, 20 हजार रुपये रोख व 10 हजार रुपये असलेले लग्नाचे पाकीट तसेच के्रडीट, डेबीट कार्ड यासह महत्वाची कागदपत्रे असा जवळपास 1 लाख 64 हजारांचे दागिने व मोबाईल असा ऐवज होता.
‘प्रेसिडेंट’मधून यापूर्वीही चोरी

प्रेसिडंट हॉटेलमधून यापूर्वीही लग्नासाठी आलेल्या एका महिलेची पर्स चोरीला गेली होती. त्याच पध्दतीने शीतल शहा यांचीही बॅग लांबविली गेली. याप्रकरणी शहा यांच्या फिर्यादीवरून रविवारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक संदिप पाटील तपास करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!