Type to search

Featured

जळगाव : प्रकल्प संचालक सुनील गायकवाड यांचे निधन

Share
Sunil gayakwad

जळगाव –

येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील गायकवाड यांचे सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले.

गेल्या दोन महिन्यांपूर्वी त्यांची बायपास शस्त्रक्रिया झाली होती. डिसेंबर महिन्यात प्रभारी सीईओ म्हणून कारभार हाती घेतल्यानंतर २० दिवसांनी त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी नाशिकला रवाना झाले होते. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरु असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली.

नाशिक येथील मुळचे रहिवासी असलेले सुनील मोतीराम गायकवाड हे जळगाव जिल्हा परिषदे अंतर्गत असलेल्या जळगाव जिल्हा ग्रामीण यंत्रणा विभागात ते गेल्या दोन वर्षांपासून प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होते.

यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून चार वर्ष काम सांभाळले होते. दरम्यान, १९९३ साली त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे वर्ग १ या पदासाठी निवड करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी विविध पदांवर काम केले आहे

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!