Type to search

Featured जळगाव

जळगाव : प्रजासत्ताक दिनी जवान फौंडेशनतर्फे “अशफाकराम” एकपात्री प्रयोगाचे आयोजन

Share

जळगाव – प्रतिनिधी 

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जवान फौंडेशनतर्फे राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित एकपात्री प्रयोगाचे आयोजन रविवारी २६ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृहात होणार आहे.

विमर्श मुंबई प्रस्तुत “अशफाकराम” महान क्रांतिकारक शहीद रामप्रसाद ‘बिस्मिल’ आणि शहीद अशफाक उल्लाह खान यांच्या जीवन व कार्यावर आधारित अत्यंत भावस्पर्शी एकपात्री प्रयोगाचे लेखक सुधीर विद्यार्थी हे असून संपादन, दिग्दर्शन व एकपात्री अभिनय मनीष मुनी सादर करणार आहे.

हा प्रयोग सलग ८० मिनिटांचा आहे. तसेच प्रवेश सर्वांसाठी खुला आणि निःशुल्क असून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जवान फौंडेशनचे अध्यक्ष माजी सैनिक ईश्वर मोरे व सामाजिक कार्यकर्ते अशफाक पिंजारी यांनी केले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!