Type to search

maharashtra जळगाव

रस्ते, गटारींकडे दुर्लक्ष; नगरसेवक उदासीन

Share
जळगाव । प्रभाग क्र. 17 मध्ये रस्त्यांची समस्या ही गंभीर असून रस्त्यांवर मुरूम, खडी अंगावर उडत असते. अमृत योजनेच्या कामांसाठी येथे पाईप टाकण्याचे काम अजून बर्‍याच भागात सुरू झाले नाही. तसेच विस्तार व क्षेत्राने मोठा असा हा वार्ड आहे. मात्र, सार्वजनिक शौचालये, मुतारींचा अभाव आहे. पाणीपुरवठा कमी दाबाचा होतो, गटारी चोकअप, ओपन स्पेसवर कचरा टाकला जातो, त्यासाठी कुंडीची व्यवस्था नाही, समस्याबाबत रहिवाशांचीही उदासीनता असल्याचे प्रभागात फेरफटका मारल्यानंतर दिसून आले.

परिसरात चोर्‍यांच्या प्रमाणात वाढ
अयोध्यानगर तसेच चिमुकले बालाजी मंदिर परिसरात चोर्‍या होतात, चोर्‍यांचे प्रमाण वाढल्याने रहिवाशांना स्वत: जागून पहारा द्यावा लागतो, पाणीपुरवठ्याचे टायमिंग नाही, केव्हाही पाणी येतं, तेही पुरेशा प्रमाणात येत नाही, साफसफाई होत नाही, महादेव मंदिर, ओपन स्पेस आहेत. कचर्‍यासाठी गाडी येते ती दत्त मंदिरापासून सरळ हायवेकडे निघून जाते, मध्ये कुठे थांबत नाही.

प्रभागात समावेश असलेला भाग
सदगुरु नगर, सदोबा नगर, अशोक नगर, औद्योगिक नगर, अयोध्या नगर, लिलापार्क, सोपानदेव नगर, कौतिक नगर, रामचंद्र नगर, एस. टी. कॉलनी, तळेले कॉलनी, काशी उखाजी कोल्हे शाळेपुढील भाग असा परिसर, ऑटोनगर, व इतर भाग येत असून नगरसेवक विश्वनाथ खडके, सुनील खडके, रंजना सोनार, मिनाक्षी पाटील हे या भागाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.

स्वामी समर्थ केंद्र परिसर, कौतिकनगर, सोपानदेव नगर, अ‍ॅटोनगर यासह जिथे गटारी नसतील तेथे 2.48 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. मी पॅनल प्रमुख नात्याने हा निधी मंजूर करुन लवकरच गटारींची कामे, स्वच्छतेची कामे परिसरात होतील. यमुनानगरात गटारींचे कामे पुर्ण झालेली आहेत. इतरही परिसरात ते लवकरच करु.
-सुनील खडके, नगरसेवक

परिसरातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री निधीअंतर्गत आमदा

रांमार्फत निधी मंजूर झालेला आहे. लवकरच रस्त्यांची कामे हाती घेण्यात येतील. तसेच विकासाची कामे भूखंड डेव्हलपींगची कामे प्रोसेसिंगमध्ये टाकलेली आहे. याबाबत लवकरच डेंटर काढले जाईल. परिसरातील विकासकामे करण्यात येतील. तसेच परिसर सुशोभित करण्यात येईल.
-मीनाक्षी पाटील, नगरसेविका

पाण्याची वेळ निश्चित करा!
अयोध्यानगरातील स्वामी समर्थ केंद्र परिसरात पाणी 5 दिवसाआड व कमी दाबाचे येत असते, किमान पाउणतास पाणी येते, रात्री बेरात्री येते, पाणी पुरेशा प्रमाणात व एक निश्चित वेळ ठरवून द्यावी. पाण्याची वेळ निश्चित करावी. पाण्यासाठी रात्री उषशिरापर्यंत जागे रहावे लागते. तसचे पाणी पुर्ण दाबाने सोडण्यात यावे.
– मनिषा पाटील

रस्त्यांची दुरावस्था
गेल्या अनेक वर्षापासून रस्ते नाहीत, खडी, मुरूम अंगावर उडते, त्यामुळे वाद होतात, परिसरात स्वामी समर्थ केंद्र आहे येथे अनेक भाविक येतात मात्र रस्त्यांची दुरावस्था आहे. येथे गटारींचीही समस्या आहे. गटारी या भागात नाहीत. ही गेल्या अनेक वर्षांपासूनची स्थिती आहे.
– दौलत माळी

परिसरात स्वच्छता हवी!
परिसरात रस्त्याच्या समस्येसह गटारीची समस्या आहे, स्वखर्चाने साफसफाई, गटारीची स्वच्छता करुन घेतली जाते, अमृत योजनेचे पाईप टाकले आहेत मात्र ते दूर अंतरावर आहे. महापालिकेतर्फे गटारींची कामे करण्यात यावीत तसेच परिसरात स्वच्छता ठेवण्यात यावी.
– कांतिलाल सपकाळे

पुरेसे पाणी द्या!
पाण्यासाठी रात्री जागे रहावे लागते, निश्चित अशी वेळ नाही, पाईप लाईन फुटल्यास वा कुठे गळती झाल्यास 6 ते 8 दिवस पाणी येत नाही, परिसरात तासभर पाणी येते ते कमी दाबाने येते, गटारी नाहीत. आमच्या घराजवळ काही कच्च्या गटारी आहेत. त्यांची स्वच्छता प्रभागातील नागरिक स्वखर्चाने करुन घेतात.
– हर्षदा पाटील

गटारींची समस्या सोडवा!
परिसरात अनेक वर्षांपासून रस्तेच नाहीत तसेच श्री.बडगुरज यांचे दवाखान्यापासून थेट हायवेपर्यंतचा रस्ता हा वर्दळीचा आहे. या रस्त्यावरील खडी, रेती, अंगावर उडते. रस्ते दुरुस्तीची अपेक्षा, पाणीपुरवठा नियमित व पुरेशा प्रमाणात करावा. बगीच्यात देखरेखीसाठी कायमस्वरुपी कर्मचारी नियुक्त करावा.
– भरत पाटील

चार टर्मपासून रस्ते नाही!
या प्रभागात गेल्या 4 टर्मपासून रस्तेच झालेले नाहीत, तसेच गटारी नाहीत, माजी नगरसेवक छबिलदास खडके यांच्या कार्यकाळात जी कामे झालेली आहेत, त्यानंतर कामे रखडली, बगीचे नाहीत, जो आहे त्याची दुरावस्था आहे. बगीच्यात लहान मुले महिलांचा वावरद असतो. तेथे देखरेखीसाठी कर्मचार्‍याची नियुक्ती करायला हवी.
– अविनाश पाटील

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!