Type to search

जळगाव राजकीय

शिवसेना सदैव भक्कमपणे बळीराजाच्या पाठीशी राहणार

Share

जळगाव । जिल्ह्यातील शेतकरी हा ओल्या दुष्काळामुळे पूर्णपणे खचला असून त्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी गावोगावी दुष्काळी मदत केंद्र सुरू करण्याच्या सूचना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ  यांनी देऊ पीक विमा मदत केंद्राप्रमाणे दुष्काळी मदत केंद्र  हे शेतकर्‍यांना आधारवड ठरले पाहिजे, असे काम करण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले असून त्याची अंमलबजावणी करावी, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले. सोमवारी पदमालय येथे शिवसेनेच्या जिल्हा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीला कृऊबा समितीचे सभापती कैलास चौधरी, मनपा विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, नगरसेवक विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, गणेश सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, प्रतापराव पाटील, उपजिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, प्रा.आर.बी.पाटील, पी.एम.पाटील, महेंद्रसिंग पाटील, तालुका प्रमुख गजानन पाटील, वासुदेव पाटील, आसाराम कोळी, हुकूम मास्तर, शिवकुमार पाटील, चिंतामण जैतकर, प्रेमराज पाटील, अनिल पाटील, महिला आघाडीच्या शोभा चौधरी, मंगला बारी, ज्योती शिवदे, मनीषा पाटील, नाना ठाकरे, जनाताई पाटील, कल्पना कापडणे, राजेंद्र महाजन, नपाचे गटनेते पप्पू भावे आदी उपस्थित होते.

जिल्हा प्रमुख वाघ पुढे म्हणाले की, जगाचा पोशिंदा म्हणणार्‍या बळीराजा हा आसमानी संकटात सापडलेला आहे. शेतकर्‍यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी अतिवृष्टीमुळे निसर्गाने हिसकावून घेतला आहे. शेतातील केळी, मका, ज्वारी, कपाशी इतर कडधान्य संपूर्णपणे भूईसपाट झाल्याने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे  शेतकर्‍यांना आजमितीला दिलासा देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शेतकर्‍यांना मदत केंद्राद्वारे तत्पर राहावे. प्रत्येक तालुकास्तरावर संघटनात्मक मजबूत बांधणी करून 20 टक्के राजकारणासह 80 समाजकारणाची चळवळ कायम राहू द्या, असेही आवाहन जिल्हा प्रमुख वाघ यांनी केले. सूत्रसंचालन उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील यांनी केले. आभार महानगर प्रमुख शरद तायडे यांनी मानले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!