Type to search

जळगाव राजकीय

लोकसभेत भाजप-सेनेची विधानसभेची साखरपेरणी

Share

जळगाव । भाजप-शिवसेना महायुतीने जळगाव व रावेर लोकसभा निवडणुकीचा गड कायम राखत प्रतिस्पर्धी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मातब्बर उमेदवारांचा दारुण पराभव केला. मागील निवडणुकीपेक्षा यावेळी भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी मतांचा लीड सर करीत स्वत:च्या मतांचे रेकॉर्ड मोडले आहे. या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी साखर पेरणी करीत विधानसभेची पाया भरणी केली जात होती. या रंगीत तालीममध्ये शिवसेनेचा उमेदवार नसतानाही युती धर्म पाळत या निवडणुकीत भाजपच्या दोन्ही जागांवरील उमेदवारांना विजयी केले. ‘अब की बार मोदी सरकार’ ‘नमो’च्या लाटेत सर्वच भूईसपाट’अशा घोषणासह सर्वत्र विजयाचा जल्लोष करीत आता भाजप-शिवसेनेला विधानसभेसाठी मैदान मोकळे झाले आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा वारु रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला कंबर कसावी लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी जळगाव जिल्ह्यातील समीकरणे बदलणार की काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची नवी मुहूर्तमेढ रोवली जाणार अशी राजकीय गणिते बांधली जात होती. जळगाव लोकसभेतून गुलाबराव देवकर यांचे नाव जाहीर झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीलाच गाठीभेटी सुरु केल्या केल्या होत्या. जळगावची जागा पडणार अशा चर्चाना उधान आले होते. त्यामुळे गुलाबराव देवकर यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला आहे, असे वाटत असताना उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द केली आणि जळगाव लोकसभा मतदार संघात नव ‘उन्मेष’ करीत उन्मेष पाटील यांची एन्ट्री मोठी थक्क करणारी ठरली आहे. ए.टी.पाटील यांचे तिकीट नाकारुन भाजपच्या विधान परिषद सदस्या स्मिता वाघ यांना तिकीट जाहीर केले. स्मिता वाघ यांनी फार्म भरुन प्र्रचारला प्रारंभ केला होता. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उन्मेश पाटील यांची अचानक एन्टी होत स्मिता वाघ यांना माघार घ्यावी लागली. त्यानंतर अमळनेर येथील सभेत माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील व भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांयातील राजकीय राडा जिल्ह्यातच नव्हे देशाच्या कानोकोपर्‍यात पोहचला आणि उन्मेष पाटील यांचा नव ‘उन्मेष’ होण्याचा प्रारंभ झाला होता. जळगाव लोकसभा मतदार संघातील चाळीसगाव, जळगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, पारोळा, जळगाव ग्रामीण, अमळनेर या मतदार संघात गुलाबराव देवकर यांना लीड मिळून विजयी होण्याची आशा होती. मात्र जळगाव, चाळीसगाव, अमळनेर, एरंडोल या मतदार संघात उन्मेश पाटील यांना लीडच काय या मतदार संघात धक्का बसण्याची शक्यता वर्तविली जात होती. जळगाव ग्रामीणमधून ना.गुलाबराव पाटील यांचा गुलाबराव देवकर यांना छुप्पा पाठिंबा अशा वावटळ्या उठविण्यात आली होती. मात्र भाजप-शिवसेना युतीचे नेते-कार्यकर्त्यांच्या संघटन शक्तीच्या जोरावर उन्मेश पाटील यांची मतांची टक्केवारी वाढण्यात मोलाची कामगिरी बजावली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!