Type to search

मान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री

maharashtra जळगाव राजकीय

मान, सन्मान, स्वाभिमानासाठी पुन्हा हवे मोदी सरकार-मुख्यमंत्री

Share
अमळनेर । ही निवडणूक देशाच्या अस्मितेची असून भारतीयांचा मान, सन्मान, स्वाभिमान सुरक्षीत ठेवण्यासाठी पुन्हा एकदा केंद्रात मोदी सरकार येण्यासाठी भाजपा शिवसेना रिपाई महायुतीचे उमेदवार उन्मेश पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी अमळनेर येथे केले. विजय संकल्प सभेचे आयोजन आज दुपारी 1 वाजता शिवाजी महाराज नाट्यगृहा शेजारील प्रांगणात करण्यात आले होते.

यावेळी ना.गिरिष महाजन, ना.गुलाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आ.शिरिष चौधरी, आ.स्मिता वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी केंद्रिय मंत्री एम.के.पाटील, माजी आ. चिमणराव पाटील, जि.प. अध्यक्षा उज्वला पाटील, नगराध्यक्ष करण पवार, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, माजी आ. साहेबराव पाटील, माजी आ. डॉ बी.एस. पाटील, हिरा उद्योग समुहाचे डॉ.रविंद्र चौधरी, युतीतील सहयोगी पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. अत्यंत आवेशपूर्ण भाषणातून ना.फडणविस यांनी विरोधकांचा समाचार घेत मोदी सरकारच्या योजनांची माहिती दिली. सभेला भर उन्हातही प्रचंड गर्दी होती. मागील आठवड्यात झालेल्या व्यासपिठावरील राड्याची घटना लक्षात घेता पोलीस यंत्रणा सज्ज होती. मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

30 मिनटांच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी पुलवामाचा बदला, सर्जिकल स्ट्राईक, मोदी सरकारने पाकीस्तानला वठणीवर आणण्यासाठी सैनाला दिलेली सूट या मुद्यांसह विविध योजनांबाबत माहिती सांगीतली. तालुक्याचा अस्मितेचा प्रश्न असलेला पाडळसरे धरण प्रकल्प हा राज्याचे जलसंपदा मंत्रीच पूर्ण करतील असे सांगून पाडळसरेचे ओझे ना.महाजन यांचेकडे टोलवले. उमेदवार उन्मेष पाटील, ना.गुलाबराव पाटील, आ.शिरिष चौधरी, आ.स्मिता वाघ यांनी मनोगतातून पाडळसरे, नार पार सह माळन नदी व नदी जोड प्रकल्पाचे कामांचे मुद्दे उपस्थित करून विकासा करिता अमळनेर तालुका दत्तक घेण्याचे आवाहन केले.

व्यासपिठावर सेनेचे उपजिल्हा प्रमुख डॉ.राजेंद्र पिंगळे, तालुका प्रमूख राजू पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, श्याम आहिरे, बेटी बचाओच्या सौ.अस्मिता पाटील, रिपाईचे पदाधिकारी उपस्थित होते. डॉ.बी.एस.पाटील व जिल्हाध्यक्ष उदय वाघ एकमेकांचे विरूध्द दिशेला बसले होते, दोघांनीही मनोगत व्यक्त केले नाही. सूत्रसंचलन शरद सोनवणे यांनी केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!