आघाडीत काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना योग्य सन्मान द्यावा

काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या बैठकीत मागणी

0
जळगाव । आगामी लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांनी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकार्‍यांना बॅनर, पोस्टरमध्ये योग्य स्थान देऊन सन्मान द्यावा, अशी अपेक्षा काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.

जिल्हा काँगे्रस कमिटी अल्पसंख्यक विभागाचे जिल्हाध्यक्ष मो. मुनंव्वर खानतर्फे यांनी जळगाव शहर कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. ही बैठक जिला अल्पसंख्यक विभागाचे समन्वयक अ‍ॅड. सलीम पटेल यांच्या अध्यक्षतेखाली व महानगर्र्र जिल्हाध्यक्ष डॉ राधेशाम चौधरी यांच्यामार्गदर्शन खाली झाली.

भाजपला पराभूत करायचे असेल तर आघाडीत सर्वांनी एकदिलाने काम करावे, जर काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना योग्य सन्मान मिळाला तर जोरदार कामाला लागू, असे पदाधिकार्‍यांनी सांगितले. युवकचे अध्यक्ष हीतेश पाटील, बाबा देशमुख, नदीम भाई काझी, मजीब पटेल, अ‍ॅड. रज्जाक शेख, जिल्हा सचीव शहर अध्यक्ष सईद तेली, तालुका अध्यश अलीम मुजावर, उतर माहाराष्ट्रातील सचीव हमीद शेख, जिला उपाध्यक्ष अमजद खान, यावल तालुका अध्यश ईकलाक सैय्यद, राज मोहमद, गफुर खाटीक, रावेर तालुका अध्यश शकील भाई, जामनेर तालुका अध्यश तेजमल जैन आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*