समाजवादी पक्षाच्या माजी पदाधिकार्‍यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0
जळगाव । समाजवादी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते रागिब अहमद यांच्यासह चौघांनी शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आज देशात गांधी हवे की गोडसे असे एकंदरीत वातावरण निर्मिती असून यात आम्ही गांधींना निवडले आहे. मोंदीना हरविण्याची ताकद ही केवळ राहुल गांधीत असल्याने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे यावेळी या पदाधिकार्‍यांनी सांगितले.

शहर जिल्हाध्यक्ष डॉ.राधेशाम चौधरी यांच्यासह पदाधिकार्‍यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली. रागीब अहमद यांच्यासह समाजवादीचे माजी जिल्हा सचिव फरहान खान, शेख, माजी शहर सचिव, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अल्ताफ शेख, मूश्ताक शेख, सामाजिक कार्यकर्ते तबरेज शेख, अब्दुल कदीर, युनस शेख हे प्रवेश करीत आहोत. लवकरच अनेक पक्षातील अल्पसंख्यांक पदाधिकारी काँग्रेस मध्ये प्रवेश करतील असेही सांगण्यात आले. यावेळी यावेळी प्रदेश सचिव डी.जी.पाटिल, माजी शहर अध्यक्ष रर्वीं सलीम पटेल, अविनाश भालेराव, नदीम काझी, जमील शेख, संदीप तेले, शफी बागवान, मुजीब पटेल, अशफाक बागवान आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कुटुंब फोडण्याचा प्रकार निषेधार्ह
सूजय विखेपाटील हे भाजपात जाणे हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. मात्र, राधाकृष्ण विखेपाटील हे आजही विरोधीपक्ष नेता या संविधानिक पदावर कायम आहेत. भाजपचा मात्र कुटुंब फोडण्याचा हा प्रकार निषेधार्ह असल्याचा आरोप शहर जिल्हाध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी यांनी केला आहे.

मोदी नावाचा राक्षस: डी.जी.पाटील यांची टीका
पुरोगामी विचारांची मंडळी विविध पक्षांमध्ये विभागली गेली होती. ती एकत्र येत आहे. मोदी नावाच्या राक्षलाला पराभूत करण्यासाठी एकत्र येण्याची ही अचूक वेळ आहे. सर्वधर्म समभाव मानणारा एक वर्ग एकत्र येतोय. याचे परिणाम आगामी लोकसभेत दिसतील, असा दावा प्रदेश सचिव डी जी पाटील यांनी यावेळी केला.

LEAVE A REPLY

*