जळगाव । लोकसभा निवडणुकीची आचारसंहीता जाहीर होवून देखील अद्याप भाजपाकडून जिल्हयातील रावेर आणि जळगाव च्या जागेवर उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे उलट सुलट चर्चांना उधान आले आहे. दररोज वेगवेगळी नावे सोशल मिडीयातून चर्चेत येत आहेत. मात्र भाजपाच्या दोन्ही उमेदवारांच्या नावांची घोषणा शनिवारी दिल्ली येथे होत असलेल्या पार्लामेंन्टरी बोर्डाच्या बैठकीनंतर जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीची आचासंहीता जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरातील राजकीय हवा तापली असतांना उमेदवारांची शोधाशोध सुरू झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागांवर अद्याप पर्यंत उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. त्या उलट राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हयातील जळगाव लोकसभेसाठी गुलाबराव देवकरांचे नाव जाहीर करून टाकले आहे. देवकरांनी आपला प्रचार देखील सुरू केला आहे.

संपूर्ण अधिकार पार्लामेंन्टरी बोर्डालाच!
भाजपा ही केडर बेस पार्टी असल्याने भाजपात जागा वाटप व जांगांची निश्चिती करण्याचा अधिकार हा पार्लामेंन्टरी बोर्डालाच असतो. त्यामुळे आता फायनल उमेदवारांच्या नावांची घोषणा ही पार्लामेंन्टरी बोर्डच करू शकेल. शनिवारी लोकसभेच्या जागा निश्चीत करण्यासाठी राष्ट्रीय कार्यालयात मोदींच्या नेतृत्वाखाली पार्लामेंन्टरी बोर्डची बैठक होणार आहे. या बैठकीत अंतीम नावांवर शिक्कामोर्तब होणार आहे.

नावांबाबत संदीग्धता कायम!
जिल्ह्यातील सध्याचे दोन्ही खासदारांना उमेदवारी मिळणार नसल्याची चर्चा मध्यंतरी जोर धरून होती. त्यातच रक्षा खडसेंचे तिकीट कापले जाणार असल्याच्या चर्चेला देखील उधान आले होते. असे असतांना आता रावेरातून रक्षा खडसेंचे नाव फायनल करण्यात आले आहे. तर जळगावसाठी आमदार स्मीता वाघ, आणि करण पवार यांच्या नावात चुरस असल्याच्या वावड्या देखील उठवील्या जात आहेत. त्यामुळे सोशल मिडीयावर राजकीय हवा चांगलीच गरम झाल्याचे बघावयास मिळत आहे. दोन्ही जागांवरील उमेदवारांची नावे अधांतरीच असतांना इच्छूक उमेदवारांचे फॉलोअर्स मात्र सोशल मिडीयावर अफवा उठवून जबरदस्त कॅम्पेन करीत आहेत. दोन दिवसांपुर्वी मुंबईत भाजपाच्या कोअर कमेटीची बैठक झाली. या पैठकीत इच्छूक उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यात येवून इच्छूकांपैकी मतदार संघाचा विचार करता कोण उमेदवार कसा फीट राहील यावर देखील चर्चा झाली. चर्चेअंती नेत्यांचे एकमत झालेली नावे दिल्लीच्या पार्लामेंन्टरी बोर्डकडे पाठवीण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

*