पोलिसात तक्रार देण्यासाठी सिटीझन पोर्टल कार्यान्वित

0
जळगाव । दि.29 । प्रतिनिधी-पंतप्रधानांच्या संकल्पनेतून देशाची सध्या पेपरलेस कडे वाटचाल सुरु आहे. तसेच डिजीटल इंडियाच्या माध्यमातून पोलिस प्रशासनाने देखील साथ देत पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आता सिटीझन पोर्टल ही सुविधा सुरु केली आहे.
यातून नागरीकांच्या मनात असलेली पोलिसांविषयीची भीती दूर होवून जवळीक साधता येणार असल्याची माहिती अप्पर पोलिस अधिक्षक बच्चन सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शासनाने तयार केलेल्या सिटीझन पोर्टलची माहिती व मार्गदर्शनासाठी राज्यातील अपर पोलीस अधिक्षकांची कार्यशाळा पुणे येथे आयोजीत करण्यात आली होती.

या कार्यशाळेत राज्य सीआयडी अधिकारी संदीप सिंघल व संजिव कुमार यांनी मार्गदर्शन केले. तयार करण्यात आलेल्या पोर्टलच्या माध्यमातुन नागरीकाला पोलिस ठाण्यात3 न जाता आता ऑनलाईन तक्रार दाखल करता येवू शकते.

त्यासाठी पोर्टलवर लॉगीन आयडी बनविणे गरजेचे आहे. तसेच पोर्टलवर तक्रार दिल्या नंतर संबधीत पोलीस ठाण्यात तक्रार पोहचून संबंधित तक्रारीची माहिती तेथील पोलीस निरीक्षकाला मिळते.

त्यानंतर तक्रारीची चौकशी होवून तसा अहवाल पोलीस अधिकार्‍याला मिळत असतो. तसेच नागरीकालार आपल्या मोबाईल वरुन देखील तक्रार दाखल करता येवू शकते.

तक्रार दाखल झाल्या नंतर त्याची पीडीएफ फाईल संकेत स्थळावर अपलोड केली जाते. तक्रार आनलाईन अपलोड करावी किंवा नाही याचे अधिकार पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहे.

डिजीटल प्रणालीचा लाभ प्रत्येक नागरीकाने घ्यावा असे आवाहन बच्चन सिंह यांनी केले आहे.या पत्रपरिषदेला डिवायएसपी सचिन सांगळे, पोलिस निरीक्षक सुनिल गायकवाड उपस्थित होते.

पोर्टल मधील सुविधा
शासनाने तयार केलेल्या सिटीझन पोर्टलवर सर्व्हीस साईड आणि तक्रार साईड अशा दोन साईड आहेत. यामध्ये मराठी व इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये हे पोर्टल तयार करण्यात आले आहे.

सर्व्हीस साईड मध्ये पासपोर्ट, चरित्र पडताळणी आदी सेवांसाठी तर तक्रार साईडमध्ये अर्ज, निवेदन,तक्रार आदी करता येणार आहे.

तसेच या पोर्टलच्या माध्यमातुन खोट्या तक्रारींना आळा बसणार आहे. त्याचप्रमाणे पोर्टलवर अनोळखी मृतदेहांची माहिती व छायाचित्र प्रसिध्द केले जाणार आहे.

 

LEAVE A REPLY

*