Type to search

जळगाव

जळगाव पोलीस कर्मचार्‍यांच्या बदली प्रक्रियेला आजपासून प्रारंभ

Share

जळगाव । जिल्हा पोलीस दलातील कर्मचार्‍यांच्या बदली प्रक्रियेला शनिवार उद्या दि.25 पासून सुरुवात होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. उद्या सहाय्यक फौजदार, महिला कर्मचारी, चालक यांना बदलीसाठी मंगलम हॉल येथे बोलविण्यात आले आहे. बदलीपात्र असलेल्या कर्मचार्‍यांना विचारणा करून त्याची माहिती जाणून घेण्यात येणार आहे. त्यानंतर महिन्याअखेर बदल्यांचे गॅझेट जाहीर होणार आहे.

दरवषी मे महिन्यात पोलीस कर्मचार्‍याची बदली प्रक्रिया राबविण्यात येत असते. यावर्षी लोकसभा निवडणूका व मतमोजणी असल्याने बदली प्रक्रियेला विलंब झाला आहे. बदल्यांसाठी एकाच पोलीस स्टेशनला पाच वर्ष पूर्ण झालेल्या पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे प्रस्ताव मागविण्यात आले. जिल्ह्यातील जवळपास 370 कर्मचारी बदलीस पात्र आहे. एकाच पोलीस स्टेशनला पाच वर्ष, 12 वर्ष एकाच विभागात खंडीत, अंखडीत सेवा पूर्ण करून स्थगिती मिळविणारे कर्मचारी देखील बदलीस पात्र आहे. यातील बर्‍याच कर्मचार्‍यांनी स्थानिक गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, सायबर पोलीस स्टेशन यासह क्रिम पोलीस स्टेशनला पसंती दिली आहे. रिक्त पदे व पसंतीचा मेळ घालून अतिशय पारदर्शी पध्दतीने बदली प्रक्रीया राबविली जाणार आहे. उद्या दि.25 रोजी सहाय्यक फौजदार, महिला, चालक यांना बोलविण्यात आले आहे. तर दि.27 रोजी पोलीस हेडकॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल व विनंती बदल्या असलेल्या कर्मचार्‍यांना बोलविण्यात येणार आहे.

स्थागुशा, पसंतीच्या ठिकाणी बदलीसाठी 200 कर्मचार्‍यांची वेटींग लिस्ट
स्थानिक गुन्हे शाखेसह पसंतीच्या ठिकाणी बदली मिळावी यासाठी बर्‍याचशा कर्मचार्‍यांनी जामनेर वारी करून फिल्डिंग लावली आहे. मंत्री महोदयांकडे जवळपास 200 कर्मचार्‍यांची वेटींग लिस्ट असल्याने बदलीची प्रक्रिया पारदशीपणे राबविण्यासाठी पोलीस प्रशासनाचा चांगलाच कस लागणार आहे. बदल्यांची प्रक्रिया पार पडल्यानंतर महिन्याअखेर बदल्यासंच्या याद्या जाहीर होणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!