Type to search

Breaking News जळगाव मुख्य बातम्या

जळगाव जिल्ह्यातील 7 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Share

जळगाव । दलातील 7 पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी काढले. जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या निरीक्षकपदी धुळे येथील अकबर पटेल यांची तर रामानंद नगर पोलीस स्टेशनला अमळनेरचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी या अनुषंगाने जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक यांच्या प्रशासकीय बदल्यांबाबत चर्चा करण्यात आल्यानंतर यावलचे निरीक्षक दत्तात्रय बडगुजर यांची सायबर पोलीस स्टेशनला, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक रविकांत सोनवणे यांची यावल पोस्टेला, सायबर पोलीस स्टेशनचे अरुण निकम यांची शहर पोस्टेला, धरणगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक अंबादास मोरे यांची अमळनेर पोलीस स्टेशनला बदली करण्यात आली आहे. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आराक यांना मुदतवाढ देण्यात आली असून सपोनि रविंद्र जाधव यांची कासोदा पोस्टे, सपोनि प्रकाश वानखेडे यांची फैजपूर, राहुल वाघ यांना प्रशासकीय मुदतवाढ, चाळीसगाव शहर वाहतुक शाखेचे सपोनि सुरेश शिरसाठ यांना मुदतवाढ, पवन देसले यांची धरणगाव पोस्टे, सुनंदा पाटील यांची मानव संसाधन विभाग तसेच नाशिक ग्रामीण येथून बदलून आलेले संदीप बोरसे यांची वरणगाव पोस्टे, सुहास राऊत यांची रामानंद नगर पोस्टे, रावसाहेब किर्तीकर यांची बाजारपेठ पोस्टे, प्रविण सांळुखे यांची नाशिरबाद पोस्टे, रावसाहेब फुला यांची मारवड पोस्टे, नगर येथून बदलून आलेले सचिन जाधव यांची भडगाव पोस्टे तर गोंदिया येथून बदलून आलेले स्वप्निल उगवणे यांची चोपडा शहर पोलीसात बदली करण्यात आली आहे. तर विनंतीवरून सपोनि सचिन बेंद्रे यांची मेहुणबारे पोलीसात, राजेश शिंदे यांची वाचक शाखा, महेश जानकर यांची निंभोरा पोस्टे, रविंद्र बागुल यांची पिंपळगाव हरेश्वर तर योगेश तांदळे यांची अडावद पोस्टेला बदली करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!