Type to search

maharashtra जळगाव मुख्य बातम्या

जळगाव जिल्ह्यातील चार पोलीस निलंबित!

Share
जळगाव । अक्षयतृतीया सणाच्या काळात खान्देशात मोठ्या प्रमाणात पत्त्यांचे क्लब चालतात. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने पोलिसांनी जिल्हाभर धाडी टाकून कारवाया केल्या.परंतु काही ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या नावाने धाडी टाकून पोलिसांनी आपले हात ओले करून घेतले होते.

याप्रकरणी चोपडा येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी चौकशी करून वरिष्ठांना अहवाल सादर केला. त्यांच्या अहवालावरून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी चार पोलिसांना तडकाफडकी निलंबित केले आहे. या कारवाईमुळे जिल्हा पोलीसदलात प्रचंड खडबळ उडाली आहे.

धाड प्रकरणी सहाय्यक पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी सांगितले की,अक्षय तृतीया सणाच्या दरम्यान माझ्या गैरहजेरीत चार पोलिसांनी पत्यांच्या क्लबवर अनाधिकृत धाडी टाकून आर्थिक गैरव्यवहार केल्याचे वृत्त जिल्हाभर पसरले. याप्रकरणी चार दिवसात चौकशीत काही आक्षेपार्ह बाबी निष्पन्न झाल्या असून तसा प्राथमिक चौकशी अहवाल जळगावचे पोलीस अधीक्षक यांना पाठविला होता.

या चौकशी अहवालावरून आज 18 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी धरणगाव पोलीस स्टेशनचे हवालदार शिवाजी बाविस्कर, चोपडा ग्रामीणचे पोलीस शिपाई हितेश बेहरे, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई संतोष पारधी व पोलीस मुख्यालयातील वाहन चालक तुषार साळुंखे अशा चौघांना तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश दिलेत.तसेच आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!