पोलिसाचा विद्यार्थिनीवर बलात्कार

0
जळगाव । दि.21 । प्रतिनिधी-इंजिनिअरींगच्या विद्यार्थिनीला लग्नाचे आमीष दाखवून पोलिस कर्मचार्‍याने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी पोलिस कर्मचार्‍याचा पिता पोलिस उपनिरिक्षक याच्यासह त्याच्याविरुध्द जिल्हापेठ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पोलिस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पो.कॉ. परवेज शेख याने शिवाजीनगर परिसरातील एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला लग्नाचे खोटे आमीष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला.

सन 2012 ते 2017 या कालावधीत जळगावमधील नवीन बसस्थानक कँटीन, पोलिस कवायत मैदानाजवळील गेम रुम तसेच फर्दापूर शहरातील हॉटेल्स आदी ठिकाणी विद्यार्थिनीला नेवून तिच्यावर अत्याचार केला.

दरम्यान अत्याचार करण्यापुर्वी शेख हा मुलीला मसाला पान खाऊ घालत असल्याचे पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान परवेज शेख याचे वडिल रईस शेख यांनी विद्यार्थिनीशी असभ्य भाषेत वर्तणुक केल्याने त्याच्याविरुध्द देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात भाग 5 गु.र.नं. 66/17 नुसार भादंवि कलम 376 (2) (न), 417, 323, 504, 506, 507, 509, 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि सुप्रिया देशमुख करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

*