विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्याची जबाबदारी पालकांसह शिक्षकांची – कुलगुरु

0
जळगाव । दि.3 । प्रतिनिधी-वाहतुक समस्या, महिला सक्षमीकरण व सायबर क्राईम रोखण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्याची जबाबदारी पालकांसह शिक्षकांची असल्याचे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.पी.पाटील यांनी केले.
जळगाव जिल्हा पोलिस दल, जिल्हयातील महाविद्यालय व विद्यालयांचा संयुक्त उपक्रम जनजागृतीपर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कुलगुरु बोलत होते. कार्यक्रमावेळी पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे, अप्पर पोलिस अधिक्षक बच्चन सिंग, प्रशांत बच्छाव, डीवायएसपी सचिन सांगळे, रशिद तडवी यांच्यासह शहरातील सर्व महाविद्यालयाती प्राध्यापक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

शिक्षक व पोलिस प्रशासनातील समन्वयातून अपराध कमी होण्यास मदत होईल या अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पुढे बोलतांना कुलगुरु म्हणाले की, 21 वे शतक महिती तंत्रज्ञानाचे युग आहे. डिजीटलकडे पाऊल टाकतांना सायबर क्राईम देखील वाढत आहे.

विनाविलंब महितीची देवाणघेवाण होत असल्याने चांगल्या गोष्टींना देखील वाईट बाजू असल्याने ही बाब चिंताजनक आहे.

इंटरनेट वापराबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. तसेच रस्ता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून वाहनाचा वापर अपरिहार्य ठरत असल्याने जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो.

अपघातानंतर चर्चा होते परंतु यावर कायमस्वरुपी उपाययोजना होतांना दिसत नाही. रस्ते सुरक्षा नियमाबाबत शाळा, महाविद्यालयांमधून प्रबोधनपर जनजागृती होणे गरजेचे आहे. महिलांना हक्कांपासून वंचित ठेवले गेले आहे.

स्त्रीयांचे सामर्थ्य वाढविणे गरजेचे असून महाविद्यालयांमध्ये कृतीशील कार्यक्रम घेवून याबाबत महिलांच्या हक्कांबाबत जनजागृती होणे गरजेचे असल्याचे सांगितले.

 

 

LEAVE A REPLY

*