‘ट्रॅफिक गार्डन’च्या विकासासाठी पोलीस दलाचा पुढाकार

0
जळगाव । दि.22 । प्रतिनिधी-शहरात उद्यान विकासाच्या कामांमध्ये पोलिस प्रशासनातर्फे शाहूनगर जवळील ट्रॅफिक गार्डन हे पुन्हा विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
दरम्यान आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलिस अधिक्षक दत्तात्रेय कराळे, महापालिका आयुक्त जीवन सोनवणे यांना जागेची पाहणी केली.
शहरात विविध उद्यानांचा विकास करण्यासाठी अनेक संस्था तसेच शासनाच्या अमृत योजने अंतर्गत हरित पट्टा अंतर्गत उद्यानाचा विकास केला जात आहे.
शहराच्या मध्यवर्तीच्या ठिकाणी ओसाड असलेले शाहूनगर जवळील ट्रॅफिक गार्डन हे पुन्हा विकासीत करण्यासाठी पोलिस प्रशासनाने पुढे सरसावले आहे.

याबाबत आज प्राथमिक स्वरूपात जागेची पाहणी केली. पोलिस प्रशासन हे उद्यान विकसित करून त्याचा सांभाळ करणार आहे.

या उद्यान विकासाच्या दृष्टिकोनातून कोण कोणते कामे करायचे याबाबत 15 दिवसात पोलिस प्रशासनातर्फे अहवाल तयार केला जाणार आहे.

हा अहवाल जिल्हाधिकार्‍यांना देवून उद्यान तयार करण्यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला दिला जाणार आहे.

जागेची पाहणी वेळी सहाय्यक जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपाचे अधिकारी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*