बनावट नंबर प्लेट ; तिघांना अटक

0
जळगाव । दि.29। प्रतिनिधी-शहरातील पोलिस अधिक्षक कार्यालयासमोरुन एकाच क्रमांकाच्या दोन चारचाकी आढळून आल्याचा प्रकार दि. 25 रोजी उघडकीस आला.
दरम्यान यातील चार जणाविरुद्ध शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील तीन जणांना अटक करण्यात आली तर एक अद्यापही फरार आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील नविन बस स्थानकासमोरील पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर दि. 25 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास एमएच 19 बीयु 5535 या क्रमांच्या दोन चारचाकी मिळून आढळून आल्या.

यामध्ये नरेंद्र विठ्ठल वारके यांच्या कडे गाडीची कोणतीही कागदपत्रे नसून त्यांच्याकडे बनावट नंबर प्लेट सापडून आली. तसेच ऋषीकेश गोपालराव गरुड रा. शेंदुर्णी, राजु रामदास महाजन रा.जळगाव, निखील रमेश गोडांबे, रा.अहमदनगर व नरेंद्र वारके यांनी संगनमत करून दि. 6 जानेवारी 2014 पासून यांनी गाडीची कोणतीही नोंदणी केली नव्हती.

तसेच त्यांनी बनावट नंबर प्लेटने गाडी बाळगुन शासनाचा सुमारे 1 लाख 70 हजार 751 रुपयांचा महसूल बुडविला असल्याने पोकॉ शेखर पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक राठोड करत आहेत.

एक संशयित फरार
दोन चारचाकी गाडीचा एकाच क्रमांक असलेल्या गाडी प्रकणातील चार जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यातील तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यातील राजीव रामदास महाजन हा संशयीत आरोपी गुन्हा दाखल होण्याची कुणकूण लागल्यास फरार झाला आहे.

 

LEAVE A REPLY

*