जळगाव जिल्ह्यातील चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

0
जळगाव । नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांनी परिक्षेत्रातील पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. यात चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, शनिपेठ पोलिस स्टेशनचे प्रविण वाडीले, जळगाव तालुका पोलिस स्टेशनचे अशोक रत्नपारखी यांची नाशिक ग्रामीणला तर नियंत्रण कक्षाचे विकास वाघ यांची अहमदनगर येथे बदली करण्यात आली आहे.

चोपडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील व रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बापू रोहम यांची विनंती बदली रद्द करण्यात आली आहे.अहमदनगर येथील सुरेश शिंदे, नाशिक ग्रामीण येथील बाबासाहेब ठोंबे, विठ्ठल ससे, अरुण निकम हे चौघे पोलिस निरीक्षक जळगावी येणार आहे.

तसेच नाशिराबाद पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आर.टी. धारबळे यांची धुळ्याला, तसेच पहुर पोलिस स्टेशनचे मोहन बोरसे, नियंत्रण कक्षात असलेले योगेश देशमुख, तसेच दिपक बोरसे व अवतारसिंग चव्हाण यांची अहमदनगर येथे बदली करण्यात आली आहे.

एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक रोहन खंडागळे, जिल्हापेठ पोलिस स्टेशनच्या कविता भुजबळ, मुक्ताईनगरच्या वंदना सोनुने, शहर वाहतुक शाखेचे ज्ञानेश फडतरे व एटीसीचे गणेश इंगळे यांची अहमदनगर येथे बदली करण्यात आली आहे.

तर स्थानिक गुन्हे शाखेच्या सुप्रिया देशमुख ,जिल्हा विशेष शाखेचे कैलास खंबाट व विजया अलोने यांची नाशिक ग्रामीणला बदली करण्यात आली आहे. तर रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या प्राची राजुरकर, रोहीदास सोमवंशी व पीएसआय अशोक आहिरे यांची धुळे येथे बदली करण्यात आली आहे.

तसेच पोलिस उपनिरीक्षक गणेश इंगळे, विजय नरवाडे, विजयकुमार बोत्रे, प्रदीप वाल्हे, ज्ञानेश्वर पाकळे, मनोहर मोरे, मिलींद बागुल, नाना दाभाडे, रामलाल साठे, महादू बैसाणे, सिध्दार्थ खरे, नाना अहिरे, बारकु जाणे, ईश्वर सोनवणे, संजय पाटील, युवराज आहिरे, काशिनाथ सुरळकर, विशाल पाटील, आशिष शेळके, शिवाजी नागवे, सुकदेव बोरकडे, निलेश वतपाळ, सचिन इंगळे, मनोज खडसे यांची देखील जिल्हाबाहेर बदली करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*