Type to search

Breaking News जळगाव

जळगाव : विष प्राशन करून तरूणाची आत्महत्या

Share

जळगाव (प्रतिनिधी) –

शहरातील शनीपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जैनाबाद वड्यामाय परिसरात राहणाऱ्या अक्षय वामन कोळी (वय २०) याने दोन दिवसांपुर्वी विष प्राशन केले होते. त्याचेवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज पहाटे एक वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

अक्षय कोळी हा त्याची आई व बहीणीसोबत जैनाबाद वड्यामाय परिसरात भाड्याच्या घरात राहत होता. तो एका कंपनीत कामाला जात होता, मात्र त्याचा गेल्या चार-पाच महिन्यांपासून पगार होत नसल्याने व त्याची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने राहत असलेल्या घराचे भाडे त्यांना देणे शक्य झाले नाही. त्यामुळे घरमालकीन व कोळी यांच्यात वाद होत असत. दोन दिवसापूर्वी अक्षयची आई शेतात मजूरीसाठी गेलेली होती व बहीण राशन दुकानावर गेली होती यावेळी घरमालकीन व अक्षय यांच्या वाद झाल्याचे सांगण्यात येत असून त्याने मनस्ताप करत विष प्राषण केले. त्यास उपचारार्थ सरकारी रूग्णालयात दाखल केले होते. मात्र आज त्याचा मृत्यू झाला.

नातेवाईकांनी केला संताप
मयत अक्षय कोळी याने घरमालकीनशी झालेल्या वादातून विष प्राशन केले होते. त्यामुळे त्याच्या मृत्यूची वार्ता समजताच त्याच्या नातेवाईकांनी रूग्णालयात मोठी गर्दी करून सदर आरोपीस अटक करण्याची मागणी लावून धरली. यामुळे रूग्णालय परिसरात मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!