Type to search

जळगाव फिचर्स

सेक्स रॅकेट प्रकरणातील महिलेला सुनावली कोठडी

Share

जळगाव 
पिंप्राळ्यातील सेंट्रल बँक कॉलनीत एका फ्लॅटमधील सेक्स रॅकेट पोलिसांनी शनिवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आणले. यातील कुंटणखाना मालकीन व सहा पीडित महिला आणि तीन आंबटशौकिनांना पोलिसांनी रविवारी न्यायालयात हजर केले. कुंटणखाना मालकिनला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पीडित महिलांची रवानगी महिला सुधारगृहात झाली.

बचत गटाच्या कामानिमित्त एकत्र येत असल्याचे या महिला इतरांना सांगत होत्या. कुंटणखाना मालकीनने एका दुमजली अपार्टमेंटमध्ये खोल्या भाड्याने घेतल्या होत्या. या मालकीचे कागदोपत्रीचे नाव वेगळे आणि प्रत्यक्ष वापरातील नाव वेगळेच आढळले आहे. या सेक्स रॅकेटबद्दल पोलीस उपअधीक्षक डॉ.निलाभ रोहन यांना गोपनीय माहिती मिळाही होती. त्या आधारे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम, उपनिरीक्षक नीता कायटे आदी सहकार्‍यांचे पथक व बनावट ग्राहक तयार करुन कारवाई केली.

घटनास्थळी आढळलेले आरोपींकडील रोख 18 हजार रुपये आणि प्रत्येकांकडील मोबाइल हँडसेट पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणात आंबटशौकीन गिर्‍हाईक संदीप राजेंद्र पवार (वय 33, शशिकांतनगर, चोपडा), जितेंद्र राजेंद्र करनकाळ (वय 34, रा.लोहियानगर, चोपडा), विष्णू देविदास कोल्हे (वय 25, रा.कमळगाव, ता.चोपडा) यांच्या विरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात पिटा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींमध्ये काही महिला परजिल्हा व परप्रांतातील आहे. नाशिक जिल्ह्यातील एक 27 वर्षीय तरुणी शहरात काही शिक्षण घेत असून ती खासगी वसतीगृहात राहते. एक 21 वर्षीय तरुणी पश्चिम बंगालमधील आहे. अजून काही जणांचा शोध सुरू आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!