Type to search

Featured आरोग्यदूत जळगाव

जळगावात उद्या ‘चालत रहा, धावत रहा तुमच्या स्वास्थ्यासाठी’ कार्यक्रम

Share
Sakshi Ghe Bharari Gruoup

सखी घे भरारी ग्रुपचा उपक्रम

जळगाव – 

सखी घे भरारी या ग्रुप तर्फे ‘चालत रहा, धावत रहा तुमच्या स्वास्थ्यासाठी’ या कार्यक्रमाचे उद्या दि.५ जानेवारी २०२० रेजी सकाळी ७.३०वा. आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात महिलांसाठी चालण्याची, धावण्याची तसेच दोरीवरच्या उड्यांची स्पर्धा घेण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे स्थळ – छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, जळगाव

चालल्याने आपले हदय तसेच फुफ्फुसे मजबूत होतात, हृदय,  मेंदु, पचनसंस्थे संबंधीच्या काही तक्रारी कमी होण्यास मदत होते, ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल, डायबिटीस कमी होण्यास फायदा होतो.

तसेच स्नायू लवचिक राहतात, हाडे मजबूत राहतात, त्वचेचे आरोग्य सुधारते, चरबी कमी होऊन वजन  वाढत नाही.

चालल्याने मन आनंदी राहते, दैनंदिन कामे करताना थकवा येत नाही असे अनेक फायदे होतात.

सहभागासाठी संपर्क करा

या कार्यक्रमात ज्यांना आपला सहभाग निश्चित करायचा असेल त्यांनी  ॲड.सौ.भारती वसंत ढाके, डॉ.सौ.जयंती चौधरी, सौ.दिपाली पाटील, सौ.चित्रा महाजन, सौ.सोनाली पाटील, सौ.भारती सचिन चौधरी आणि सौ.कांचन राणे यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धा १८ वर्षावरील सर्व महिलांसाठी खुली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!