Type to search

Breaking News जळगाव

पतंग पकडण्याच्या नादात विहिरीत पडून बालकांचा मृत्यु

Share

 

पारोळा – 

येथील झाशीची राणी राणी लक्ष्मीबाईंच्या किल्ल्या मध्ये मुलं कटलेली पतंग प्कडण्याच्या नादात एका १४ वर्षीय  बालकाचा विहिरीत पडून मृत्यु झाल्याची घटना दिनांक १९ रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली

गोपाल गोविंद मरसाळे ( १४ ) रा . सुदर्शन नगर पारोळा  हा शिवाजी हायस्कूल मध्ये  ७ वी इयत्ते शिकत होता . दिनांक १९ रोजी सायकाळी ५ – ४५ च्या सुमारास किल्ल्यात  गोपालचा भाऊ व एक दोन मित्र खेळण्यासाठी आले होते .

खेळता खेळता त्यांना पतंग कटलेली दिसली या कटलेल्या पतंगीचा पाठलाग करीत असतांना मोठ मोठी गवताच्या झडामधुन मित्र पळत असतांना गवता मध्ये विहिरीचा अंदाज न आल्याने गोपाल हा  विहिरीत पडल्याची त्याचा लहान भाऊ व मित्रांनी सांगताच किल्ल्याच्या त्या विहिरी जवळ गर्दी जमा झाली हि विहिर पन्नास ते साठ फुट होती . मात्र या विहिरीत गाळ  जास्तीचा  असल्याने गोपालच्या शोध घेण्या साठी शर्तीचे प्रयत्न सुरु होते .

जावेद नजीर मेहेतर या युवकांने विहिरीत पोहण्या साठी उतरला मात्र गाळ जास्तीचा असल्याने . दुसरा युवकांने उडी मारली मात्र तो पण अशस्वी झाला .  अंधार जास्त झाल्याने विहिरीत शोध मोहिमेला अडचण येत होती .

निलेश कुंभार व मंगेश कुंभार यांनी लाईटची व्यवस्था केल्या नंतर नगरपालिका कर्मचारी संदिप बळीराम पाटील , मनोज यादवराव पाटील , सुरेश महाजन , भैय्या चौधरी यांनी दोरला बिलाई बांधुन विहिरीत सोडली काहि वेळा नंतर गोपालचा शर्ट बिलाई मध्ये अडकल्याचे लक्षात येताच वंश नरवाळे ह्या पोहणाऱ्या युवकाने विहिरीत उडी मारल्या नंतर गोपालला दोरच्या सहाय्याने वर काडले मात्र त्यांचा मृत्यु झाला होता . त्यास ताबडतोब कुटीर रुग्णालयात दाखल केला असता डॉक्टरांनी मृत घोषित केले . गोपालचा जीव वाचविण्यासाठी नगरसेवक दिपक अनुष्ठान , मनिष पाटील ,  भैय्या चौधरी , छोटू पाटील , सलिम पटवे , यांच्या सह अनेकांनी प्रयत्न केले .

...आईचा एकच हंबरडा 

दरम्यान गोपाल हा विहिरीत पडल्याची वार्ता त्यांच्या आईला समजताच त्यांच्या आईने किल्ल्यात येवून एकच हंबरडा फोडला . या वेळी त्या आईची समजुत उपस्थीत असलेल्या महिलांनी काढली . मात्र त्या महिलेचा आंकोश बघुन महिलांना ही गहिवरून आले . गोपालचे  वडिल मयत असुन आई घरकाम करून उदारनिर्वाह करीत होती गोपालला १ लहान भाऊ आहे . दरम्यान या घटनेची वार्ता समजताच किल्ल्या मध्ये एकच गर्दी झाली होती

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!