Type to search

जळगाव राजकीय

भाजपाचा झेंडा विधानसभेवर फडकणार!

Share

पारोळा | पाच वर्षात दिन-दलीत, शेतकरी, शेतमजुर, कष्टकरी, ओबीसी ह्या प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन करण्याचे काम भाजपा सरकारने केले असुन शेतकरी अडचणीत आला तेव्हा सरकार त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहे. पारोळ्याला पाण्याचे नविन आरक्षण करून भरपुर पाणी देण्याचा निर्णय घेवू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पारोळा येथे मुख्यमंत्री यांची महाजनादेश यात्रा महेश मेगा मार्ट समोरील पटांगणात आयोजित सभेत झाली. यावेळी ते बोलत होते. महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीष महाजन, खा.उन्मेश पाटील, नगराध्यक्ष करण पवार उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातुन ग्रामिण भागात तीस हजार किलो मीटर, वीस हजार राष्ट्रीय महामार्ग, तर १० हजार किलोमीटर राज्य महामार्गाचे कामे झाली असुन सिंचन क्षेत्रात महाराष्ट्र हा १८ व्या क्रमांकांवर होता आज तो तीसर्‍या क्रमांवर असुन येत्या वर्षात एक नंबर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाईल तसेच पारोळा शहर व तालुक्याला पाण्याची टंचाई भेडसावित असल्याचे नगराध्यक्ष करण पवार यांनी सांगितले असुन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी पाण्याचे आरक्षीत करून लवकरच तुम्हाला पाणीच पाणी मिळणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न कॉंग्रेस – राष्ट्रवादी पक्षाला सोडवता आला नाही तो भाजपा सरकारने सोडविला अनेक समाजाला आरक्षण देण्याचे काम या सरकारने केल पाच वर्षात सरकारने जी विकासाची कामे केली ते सांगण्या साठी महाजनादेश यात्रा असुन तुमचा अशिर्वाद हाच जनादेश समजून पुन्हा भारतीय जनता पार्टीला भरघोस मतांनी विजय करा असे आवाहन यावेळी उपस्थित नागरीकांना केले. या वेळी आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील, प्रदेश सदस्य अशोक कांडेलकर, जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष नाना पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ संजय पाटील, बाजार समिती माजी सभापती बाळासाहेब पाटील व भाजपा कार्यकर्ते उपस्यीत होते सभेचे सुत्रसंचालन प्रा. शैलेश पाटील यांनी केले . यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

नारपार गिरणा योजना कार्यान्वित करा
नारपार दमण गंगा खोर्‍यातील नद्यांमधील वाहून जाणारे विशेषतः समुद्रात वाहून जाणारे दुर्लक्षित पाणी गिरणा नदी पाण्याच्या उगम स्थळी वळवून नाशिक धुळे जळगाव संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचे कायापालट होऊन सुजलाम सुफलाम होईल व कायमस्वरूपी दुष्काळी परिस्थिती नाहीशी होऊन पिण्याचा प्रश्न व सिंचनाचा प्रश्न कायमचा सुटेल दमणगंगा नारपार पिंजाळ खोर्‍यातील माधवराव चितळे समितीने १९९८ मध्ये शासनाला अहवाल दिला १५६ टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते महाराष्ट्रातील जनतेचे सगळे पाणी आहे बर्‍याच दिवसापासून महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची व जनतेची नारपार योजना कार्यान्वयीत व्हावी यासाठी जोरदार मागणी केली. यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील उपाध्यक्ष दत्तू पाटील युवा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील प्रवक्ता भिकनराव सर भटू पाटील नाना मिस्तरी सुमित पाटील नरेश चौधरी खुशाल राजपूत भूषण निकम वेदांत पाटील इत्यादी संघर्ष शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी बहुसंख्येने हजर होते.

पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणात गेल्या चार वर्षापासून पाण्याचा थेंब नसल्याने परिसरातील सरपंच व सदस्य व ग्रामस्थानीं भोकरबारी धरणासमोर ५०० शेतकर्‍यांनी मुख्यमंत्री यांचा रास्ता रोको केला असता मुख्यमंत्री यांनी धरणाजवळ गाडी न थांबवता सरळ निघून गेल्याने कंकराज, भोकरबारी, बोदर्डे, वंजारी, शेळावे बु, शेळावे खु, दहिगाव, मोहाडी, सडावन, शेवगे बु. या १८ गावांचा पाणी पुरवठा होत असलेल्या गावांकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुर्लक्ष केले असून संबंधित ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. गिरणेतून म्हसवेत पाणी सोडून भोकरबारी धरणात पाणी सोडावे ही मागणी केली आहे. यावेळी मोंढाळे येथे तालुका उपाध्यक्ष सुधाकर पाटील, चंदूलाल पटेल, गुरुमुख जगवणी, डॉ.सुभाष भामरे, सरपंच महारु पाटोळे, भटू पाटील,विचखेडे येथे विजय निकम,सरपंच माधुरी निकम,प्रभारी सरपंच विनोद चौधरी,आसाराम गायकवाड, व ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!