Type to search

जळगाव

पारोळा पालिकेच्या भूमिकेविरोधात भाजीपाला विक्रेत्यांचा बंद

Share

पारोळा | शहरातील मुख्य बाजारपेठेत ठेलागाडीधारक हे रस्त्यावर भाजीपाला विक्रेता करीत असल्याने रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नगरपालिकेने दि.२१ रोजी भाजीपाला विक्रेता व ठेलागाडीधारकांना तोंडी सूचना व लेखी नोटीस देवुन देखील उपयोग न झाल्याने दुपारी चार वाजता पोलिस बंदोबस्तात ठेलागाडी व भाजीपाला विक्रेता अतिक्रमण काढण्यास सांगितल्याने आज दि.२२ रोजी भाजीपाला विक्रेत्यांनी बंद पुकारुन पालिकेच्या भूमिके विरोधात पाऊल उचल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान भाजीपाला विक्रेत्यांनी रितसरपणे नगरपालिकेत अर्ज करुन भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाला विक्री करण्याची परवानगी मागावी. नगरपालिकेकडुन नियोजन करुन भाजीपाला विक्रेत्यास प्रत्येकास न्याय देण्याची भुमिका घेईल त्याकरिता सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगर पालिकेने केले आहे.

विक्रेत्यांनी नगरपालिकेला दिले निवेदन
अतिक्रमण विरोधात पालिकेने घेतल्या निर्णयात बदल करुन जोपर्यत भाजीपाला मार्केटमध्ये विक्रीची सोय होत नाही तोवर आम्हांस मुख्य बाजारपेठेत नगरपालिका चौक व परिसरात खाली बसुन भाजीपाला विक्री करु द्यावा, असे निवेदन भाजीपाला विक्रेत्यांनी वरिष्ठ लिपीक यांच्याकडे निवेदन दिले. यात त्यांनी २०-२५ वर्षापासुन परिसरात आम्ही विक्री करीत असुन जागा निश्चित होईपर्यत नगर पालिका परिसरात जागा द्यावी अशी विनंती केली आहे.

भाजीपाला मार्केटमध्येच विक्री करावी : मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे
मुख्य बाजार पेठेत ठेलागाडी व काही भाजीपाला विक्रेत्यामुळे अतिक्रमण होत आहे. तोंडी सूचना व नोटीस देवुन देखील प्रतिसाद न मिळाल्याने नागरिकांच्या हितासाठी ही भुमिका घ्यावी लागली. यात सातत्य राहील. विक्रेत्यांनी भाजी मार्केटमध्येच विक्री करावी याबाबत काही अडचणी आल्यास पालिका सर्वांना सहकार्य करेल.

नूतन मुख्याधिकार्‍यांचेे मनापासुन अभिंनंदन : सखूबाई पाटील
नूतन मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे यांनी नागरिकांच्या हिताचा महत्वकांक्षी निर्णय घेऊन रस्ता मोकळा केल्याबद्दल त्यांचे सखूबाई पाटील यांनी मनापासुन अभिनंदन केले आहे.

सायंकाळी तुरळक दुकाने सुरु
भाजीपाला विक्रेत्यांनी सकाळपासुन विक्री बंद ठेवुन आपली भुमिका घेतली होती.यास प्रतिसाद मिळाला पण सायंकाळी काही विक्रेत्यांनी भाजीपाला विक्री सुरु ठेवला होता.

प्लॅास्टिक पिशव्या वापरणार्‍यांवर कारवाई
शहरात प्लॅस्टिक पिशव्या वापरणार्‍या दुकानदारांनी आपल्याकडे असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा असेल त्यांनी दोन दिवसात नगर पालिकेत जमा करावा. दोन दिवसानंतर शहरातील छोट्या मोठ्या दुकानदाराकडे प्लॅस्टिक सापडल्यास प्रथम पाच हजार दंड, दुसर्‍यांंदा सापडल्यास दहा हजार दंड, तीसर्‍यांदा सापडल्यास सरळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे यांनी दै देशदूतशी बोलतांना सांगितले. यामुळे प्लॉस्टिक विके्रत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!