Type to search

जळगाव

महिलांना रोजगार हा शिवसेनेचा एककलमी कार्यक्रम!

Share

पारोळा| योगेश पाटील

आजच्या महिला ह्या सर्वच ठिकाणी आघाडीवर असून महिलांनी आपल्यातील कला-गुणांना वाव देण्यासाठी पुढे आले पाहिजे. अनेक माहिलांनी उपस्थित केलेले प्रश्न व समस्या ह्या शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या समोर मांडून त्यातून मार्ग काढू असे आश्वासित करत होम मिनिस्टर फेम, शिवसेनेचे सचिव व महिलांचे आवडते भावजी आदेश बांदेकर यांनी महिलांना रोजगार मिळावा हा शिवसेनेचा एक कलमी कार्यक्रम असुन कामात लाज बाळगू नका, असा संदेश देत कोणी आजारी पडले तर घाबरू नका सिध्दी-विनायक ट्रस्ट आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले.

पारोळा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मधील हरीनाथ मंगल कार्यालयात अभिनेते व शिवसेना सचिव आंदेश बांदेकर यांचा खास महिलांसाठी माऊली संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आंदेश बांदेकर यांनी यावेळी महिलांना बोलतं केले.

महिला राजकारणात येत असतात परंतु ज्या महिला निवडून येतात तेथे पुरुष अर्थात नवरेबुवाचा अधिकार जास्त चालत असल्याने स्त्री स्वतंत्र झाली नसल्याची खंत व्यक्त करीत आजच्या मुली या लग्नासाठी शहरा भागातील मुलगा पाहिजे असा हट्ट धरतांना दिसत आहेत. तर विवाहिताचे ङ्गारकतीचे प्रमाण वाढत असल्याने हे कुठे तरी थांबले पाहिजे अशा भावना यावेळी महिलांकडून व्यक्त झाल्यात.

महिला या कुठल्या ही क्षेत्रात मागे राहिलेल्या नसून आपला हक्क त्यांनी दाखविला पाहिजे, स्वत: हिमतीने पुढे येवून जनतेच्या हिताची कामे केली पाहिजेत असे मत पंचायत समिती सभापती छायाबाई पाटील यांनी व्यक्त केले. मे महिन्यात गारपिट झाली होती अनेक पिकांचे नुकसान झाले मात्र अद्याप पर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे आले नसल्याचे जिजाबाई पाटील यांनी सांगितले.

पारोळ्यात अनेक मुला-मुलींना उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागत असल्याची खंत श्रीमती निकम यांनी व्यक्त केली. सुशिक्षीत बेरोजगारांचे प्रमाण वाढत आहे त्या साठी शिवसेनेने प्रयत्न करावेत व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावा असा थेट प्रश्न श्रीमती करोडपती यांनी व्यक्त करून सासु-सासरे हे आपल्या आई-वडिलांप्रमाणे असुन त्यांचा सांभाळ करण्याचे आवाहन त्यांनी केले.

नवरा-बायको यांनी एकमेकांचा समन्वय साधून आदर करा. माऊलीचा सन्मान करा हाच संदेश देऊन प्रत्येक घरात अनेक महिलांना नतमस्तक होत असल्याचे सांगत आदेश बांदेकर यांनी चिमणराव पाटील यांना निवडणूकीत सहकार्य करण्याचे आवाहन केले. माऊली संवाद या कार्यक्रमात अनेक महिलांनी होम मिनिस्टर प्रमाणे उखाणे घेणे सुरु केले होते. तब्बल दोन तास हसत -खेळत सुरु असलेल्या या कार्यक्रमाने महिलांना बोलतं करुन त्यांच्या समस्या जाणून आदेश बांदेकरांनी उपस्थीत हजारो महिलांची मने जिंकली. कार्यक्रमात मुंबईच्या माजी आमदार व माजी महापौर सौ शुभा राऊळ, खासदार संजय राऊत, माजी आ.चिमणराव पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्षा नलिनीताई पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख महिला आघाडीघ्या रचनाताई पाटील, महिला जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, विधानसभा प्रमुख राजेंद्र पाटील, बाजार समिती सभापती अमोल पाटील, बाजार समिती संचालक, एरंडोलचे शिवसेना तालुका प्रमुख वासुदेव पाटील व हजारो महिला यावेळी उपस्थीत होत्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!