Type to search

जळगाव

जिल्ह्यात विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

Share

पारोळा । आज तालुक्यातील करमाड येथील पंचेचाळीस वर्षीय व टेहू येथील बेचाळीस वर्षीय तरुणांचा विद्युत शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाला तर धुळपिंप्री येथे विजेच्या शॉकने बैलाचा मृत्यू झाला असल्याची घटना आज रोजी घडली

तालुक्यातील करमाड येथील रामदास जीवन पाटील वय 45 हे आज साय साडेसहा वाजेच्या सुमारास आपल्या घरात वायर जोडत असतांना अचानक शॉक लागल्याने ते जमिनीवर फेकले गेले त्यांना लगेच पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता उपचाराआधी ते मृत झाले होते दीपक शांताराम पाटील यांनी खबर दिल्यावरून पारोळा पोलिसात अकासमत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पो कॉ प्रवीण पाटील करीत आहे

तसेच टेहू येथील भुपेंद्र शिवाजी पाटील वय 42 हे आपल्या शेतात गेले होते साय सहा वाजेपर्यंत घरी न आल्याने त्यांचा मुलगा निरंजन शेतात शोध घेण्यास गेला असता ते शेतातील ट्रॅकटरच्या शेडम्हध्ये मृत अवस्थेत पडलेले होते व इलेक्ट्रिक वायरीचा चट चट आवाज येत होता इलेक्ट्रिक शॉक लागल्यानेच त्यांचा मृत्यू झाला याबाबत कैतिक पाटील यांनी खबर दिल्यावरून पारोळा पोलिसात अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे याचा तपास पो कॉ प्रकाश पाटील करीत आहे

पारोळा तालुक्यातील धुळपिंप्री येथील शेतकर्‍याच्या बैलाचा उघड्या ट्रान्सफर्माचा बैलास शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना आज घडली
आज तालुक्यातील धुळपिंप्री येथील जयराम तोताराम पाटील यांचा बैल शेतात जात असताना गावातीलजवळील हाकेच्या अंतरावर असलेली ट्रान्सफर्मारमध्ये करंट उतरल्याने बैलाचा धक्का लागला त्यामुळे बैल जागीच ठार झाला आहे त्यामुळे शेतकर्यांचे तीस ते पस्तीस हजाराचे नुकसान झाले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!