Type to search

maharashtra जळगाव

पळासखेडे येथील खूनाच्या गुन्ह्यात पाच जणांना जन्मठेप

Share
जळगाव । जामनेर तालुक्यातील पळासखेडा गावी अनिल खंडारे याने लहान मुलीची छेड काढल्यानंतर त्याला परिसरातील नागरिकांनी मारहाण केली होती. त्यानंतर वाद मिटला होता. औषधोपचार केल्यानंतर अनिल गावी आल्यानंतर त्याच्या भावाच्या घरी थांबवला होता. घटनेच्या दिवशी तो शौचालयाला गेल्यानंतर आरोपींना त्याला मारहाण केली. हा प्रकार त्याची पत्नी, भाऊ, वहीणी यांनी पाहिला होता. मारहाणीनंतर त्याला उचलून या पाचही जणांनी विहिरीत फेकले होते. याप्रकरणी जामनेर पोलीसात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने प्रत्यक्षदर्शीच्या साक्षी व पुराव्यांवरून पाचहणी आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथील अनिल कडू खंडारे व त्यांची पत्नी सुनिता अनिल खंडारे हे कुटुंबिय मोल मजूरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. 4 नोव्हेबर 2012 रोजी त्याने परिसरातील एका मुलीच्या अंगावरून हात फिरविला होता. त्यानंतर आनंदा उर्फ अण्णा समाधान जारे, किशोर पंढरी सुरवाडे, सागर वसंत साबळे, गौतम भिमराव जारे आणि अनिल मधुकर लोखंडे यांच्यासह गावातील काही नागरिकांनी त्याला मारहाण केली होती. औषधोपचार केल्यानंतर अनिल हा त्याचा भाऊ वसंत यांच्याकडे राहू लागला. दि.6 रोजी सायंकाळी अनिल हा शौचालयासाठी गेला असता, त्याला आरोपी आनंदा उर्फ अण्णा समाधान जारे, किशोर पंढरी सुरवाडे, सागर वसंत साबळे, गौतम भिमराव जारे आणि अनिल मधुकर लोखंडे सर्व रा. पळासखेडा ता. जामनेर यांनी घराजवळील विहिरीजवळ येवून तु आमच्या वाड्यात परत का रहायला आला असे सांगत या पाच जणांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. अनिल खंडारे याचे हातपाय पकडून चापटा बुक्क्यांनी, लाथांनी पोटावर, छातीवर, तोंडावर मारहाण केली आणि बाजूला असलेल्या विहिरीत फेकून जिवे ठार केले होते. यावेळी त्याची सुनिता , भाऊ वसंत खंडारे, वहीणी लताबाई खंडारे यानी वाद सोडविण्याचा प्रयत्न देखील होता. याप्रकरणी 7 नोव्हेंबर मयत अनिलची पत्नी सुनिता खंडारे यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही.आर. शित्रे यांनी या गुन्ह्यासंबंधीत तपास काम पुर्ण करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.

प्रत्यक्षदर्शी व शवविच्छेदन अहवालाचा पुरावा महत्वपूर्ण
या गुन्ह्यात मयताची पत्नी सुनिता खंडारे, त्याचा भाऊ वसंत खंडारे, वहीणी लताबाई खंडारे, डॉ. रविंद्र पाटील, तपासाधिकारी विश्वास शित्रे, तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. न्यायालयाने प्रत्यक्षदर्शी आणि शवविच्छेदन च्या अहवालावरून खून केल्याप्रकरणी आरोपी आनंदा उर्फ अण्णा समाधान जारे, किशोर पंढरी सुरवाडे, सागर वसंत साबळे, गौतम भिमराव जारे आणि अनिल मधुकर लोखंडे या पाच जणांना भादवी कलम 302 आणि 149 मध्ये जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी हजार रूपये दंड, दंड न भरल्यास तीन महिन्याची साधी कैद, भादवी कलम 143 मध्ये सहा महिन्याचा सश्रम कारावास व प्रत्येकी 100 रूपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवसाची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!