ऊर्जा मंत्र्यांच्या आश्वासना नंतर आ.किशोर पाटील यांचे उपोषण मागे

0
 भडगाव । दि.31 प्रतिनिधी-तालुक्यातील 132 के.व्ही. सबस्टेशनच्या प्रश्नावर आज सकाळी अकरा वाजे पासून पाचोरा भडगाव मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील हे विधानभवनाच्या पायर्‍यांवर उपोषणाला ठाण मांडुन बसले होते. उपोषणस्थळी अनेकांनी भेट दिली, यावेळी उपोषणस्थळी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाऊन चर्चा केली.
132 के.व्ही. सबस्टेशनचे काम लवकर सुरू करू असे आश्वासन मंत्र्यांनी दिल्यानंतर आमदारांनी उपोषण मागे घेतले. यावेळी ठाण्याचे पालकमंत्री शिंदे , अमळनेर चे आमदार शिरीष महाजन , चोपडया चे आमदार चंद्रकांत सोनवणे आदी उपस्थित होते .

उर्जा मंत्र्याच्या उपस्थितीत मुबंईला 8 वेळस अधिकार्‍यांच्या बैठकाही झाल्या. मात्र तरीही वीज कंपनी 132 के.व्ही. सबस्टेशनसाठी हालचाल करत नाही.

वरीष्ठ अधिकारी या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे आ. पाटील यांनी आज विधानभवनाच्या पायर्‍यांवर उपोषणाचा मार्ग अवलंबला.

132 के.व्ही. सबस्टेशनचे लवकरच काम सुरू होईल असे आश्वासन मंत्र्यांनी दिले. त्यानंतर आमदारांनी उपोषण सोडले . तर भडगाव येथेही आज या आंदोलना बाबत सकाळी नियोजन करणार होते मात्र ते उपोषण सुटल्या मुळे झाले नाही
उर्जामंत्र्यांनी स्वत: येऊन 132 के.व्ही. सबस्टेशन करण्याची मागणी मान्य केली .

लवकरच त्याचे काम सुरू करू असे सांगितले व यासंदर्भात दि 4 रोजी बैठकही आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे उपोषण मागे घेतले.

 

 

LEAVE A REPLY

*