Type to search

जळगाव

जनतेचा बुद्धिभेद करण्याचा आमदारांचा प्रयत्न!

Share

पाचोरा | धरणाच्या उभारणीचा इतिहास आम्ही यापुर्वी मांडला आहे. बहुळा धरणाची पायाभरणी कै. बापुसाहेबांनी केली आणि ते २० वर्षानंतर पुर्ण करण्याचे काम कै.ओंकारआप्पांनी केले. हे सत्य पाटबंधारे विभागाचे रेकॉर्ड तपासुन आमदारांनी मते मांडावीत, विषयाला फाटे फोडुन ते जनतेचा बुद्धिभेद करीत असून त्यांनी कै.ओंकारआप्पांची भुमिका नाकारू नये, असे आवाहन माजी आ. दिलीप वाघ यांनी केले.

७० वर्षात १४ आमदारांनी काहीच केले नाही. मी ८५० कोटींची कामे केली. आता पर्यंतच्या बहुजन समाज आमदारांना कर्तव्यशून्य संबोधून आमदारांनी बेताल वक्तव्य केले. ती चुक जाणकार शिवसैनिकांनी बहुधा आमदारांच्या लक्षात आणुन दिली असावी. म्हणुन बहुजन समाजाला खुश करून सहानुभूती मिळविण्यासाठी निवडणुक डोळ्यांसमोर ठेवुन बहुळा धरणाला स्व. के.एम. बापूंचे नाव देण्याचा आमदारांचा हा प्रयत्न आहे. नामकरणाचे स्वागत करतो. आमदारांनी येत्या कॅबीनेटच्या बैठकीत नामकरण मंजुरी घेऊन तात्काळ गॅझेटमध्ये प्रसिध्द करावे, असे श्री. वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

भावनिक मुद्दे घेवुन इतिहास लपवता येत नाही. आमदारांनी स्व.के.एम .बापुंचा गौरव केला त्याला आमचा विरोध असण्याचे कारण नाही. पण मतदार संघात विकास घडविणार्‍या इतर नेत्यांचा नामोल्लेख टाळण्याचा दळभद्रीपणा केला म्हणजे विकास कामांचा इतिहास बदलत नाही. विरोधी पक्ष मजबुत करण्याचे काम ओंकारआप्पा वाघ यांनी केले हे सर्वश्रुत आहे.

पूर्वाश्रमीचे कॉंग्रेसी कै.आर.ओ. तात्या पाटील यांनी १० वर्ष आमदार म्हणुन नेतृत्व केले .स्वतः पाच वर्षापासुन किशोर पाटील नेतृत्व करीत आहे. या काळात कै.बापूसाहेबांच्या स्मारकाचा विषय कधी आला नाही, मग आताच कसा? निवडणुक डोळ्यासमोर ठेवुन आमदार जनतेचा बुध्दीभेद करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. विकासासाठी झटणार्‍या नेत्यांचे कर्तृत्व झाकण्याचा उद्योग आम्ही कधी केला नाही. संघर्षात आमच्या घराण्यांचा बहुतांशी काळ खर्ची पडला. तरीही दिवंगत नेत्याविषयी संभ्रम आणि विभूतींचे कार्य मरणोत्तर डावलण्याचे पाप आम्ही कधी करणार नाही, अशी भूमिका दिलीप वाघ यांनी मांडली. यावेळी पीटीसी चेअरमन संजय वाघ, यांच्यासह पाचोरा भडगाव राष्ट्रवादीचे शहर तालुका पदाधिकारी उपस्थीत होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!