Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या राजकीय

जळगाव पंतप्रधानांची सभा : कडेकोट बंदोबस्त, उत्साह आणि घोषणाबाजी…

Share

राजेंद्र पाटील

जळगाव –

पंतप्रधानांना पाहण्यासाठी त्यांचे भाषण ऐकण्यासाठी जमलेली गर्दी.. इच्छुकांसह पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आलेले उधाण आणि यातून अखंडपणे होत असलेली घोषणाबाजी, अशा वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेला सुरूवात झाली.

सभेच्या पार्श्वभूमीवर जळगाव विमानतळ व सभास्थळाच्या परिसरास अक्षरश: पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. सभेला येणार्‍यांची काटेकोरपणे तपासणी केली जात होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सभास्थळी पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला.
सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपचे खा.उन्मेश पाटील, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, यांचेसह आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

जळगावची सभा ही विराट सभा व्हावी यासाठी ना.गिरीश महाजन यांनी स्वत: लक्ष देवून सभा यशस्वीतेसाठी पुरेपूर प्रयत्न केले.

ना.गुलाबराव पाटील यांची नाराजी कायम
जळगाव ग्रामीण मतदार संघात भाजपचे बंडखोर उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात असून ते भाजपचे झेंडे घेत गिरीश महाजन यांच्या नावाचा वापर करून प्रचार करत असल्याचा आरोप ना.गुलाबराव पाटील यांनी सभा सुरू होण्याअगोदर केला. सभेत बोलण्याची संधी मिळावी अशी विनंतीही त्यांनी केली. मात्र गिरीश महाजन यांनी ती फेटाळून लावत त्यांच्या तु-तु मै मै झाली.

मंडपात अनेकांना पंतप्रधान मोदी यांना जवळून पहायचे होते. गळ्यात भाजपचा दुपट्टा, डोक्यात पक्षाची टोपी अशा रूबाबत आलेले अनेक पदाधिकारी सेल्फी काढण्यात मग्न होते. काहींनी गटागटाने फोटो काढले. घोषणाबाजी, फोटोसेशन आणि परिचितांना जागा मिळवून देण्यात नेते मंडळी गुंतले होते.

वाहनधारकांची तारांबळ
पंतप्रधानांच्या सभेला प्रचंड गर्दी झाली असली तरी तिचे व्यवस्थापन करताना प्रारंभी चांगलीच तारांबळ उडाली. जळगाव विमानतळा समोरील मोकळ्या जागेत ही सभा झाली. त्यामुळे जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील वाहतुकीचा मार्ग बदलण्यात आल्याने अनेक वाहनधारकांची तारांबळ उडाली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!