Type to search

जळगाव

जीर्ण इमारत मालकांना नोटिसा ?

Share

जळगाव । जीर्ण इमारती मालकांना नोटिसा देण्याचे काम पावसाळ्यापूर्वी करण्यात येतील. शहरात 400 वर जीर्ण इमारती आहेत. जीर्ण इमारतधारकांनी आपापले इमारतींची डागडुजी, दुरूस्ती व संरक्षण करावे, कुठलीही अप्रिय घटना घडू नये, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

सावधानता बाळगणे गरजेचे
पावसाळा लागलेला आहे. पावसाला अदयाप शहरात सुरुवात झाली नसली तरी वादळ, वारा हा सुरू झालेला आहे. शहरात जीर्ण इमारती या अंदाजित 400 वर आहेत. मात्र, यातील काही इमारती या फारच जुन्या आहेत. ते वापरण्यास धोक्याचे होवू शकतात. त्यामुळे सावधान राहण्याची गरज आहे, सतर्क राहणे आवश्यक आहे. ‘नेमेचि येतो पावसाळा’… याप्रमाणे एकदा पाऊस सुरू झाला की त्याचे स्वरुप हे शब्दात मोजता न येणारे असते. पाऊस केव्हा? कसा व किती पडेल याचा अंदाज कुणीही करू शकत नाही. मात्र, सावध राहणे, सावधानता बाळगणे गरजेेचे आहे. यामुळे जीर्ण इमारतधारकांनी आपापले इमारतींची डागडुजी, दुरूस्ती व संरक्षण करावे, कुठलीही अप्रिय घटना घडू नये, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

नोटिसांची कारवाई
अतिशय जीर्ण अशा इमारती या साधारणत: 100 ते 120 असतील. या इमारत धारकांवर नोटिसा बजावण्यात येतील, असेही मनपा सूत्रांकडून समजते. जीर्ण इमारतींपासून आपल्यासह शेजारच्यांनाही धोका उद्भवू शकतो. पावसाळापूर्व कारवाईत जीर्ण इमारत धारकांना नोटिसा बजावण्याची कारवाईचा समावेश असल्याने नोटिसा बजावण्याची कारवाई होणार असे मनपा गोटातून समजते. मात्र याबाबत संबंधित अभियंत्यांशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही.

लेंडीनाला वाहतूक प्रश्नी तिढा
ममुराबाद रस्त्यावरील लेंडीनाला वाहतूकप्रश्नी भिजत घोंगडे कायम असून वाहतुकीचा तिढा अद्यापही सुटत नसल्याने शहरवासीयांची चिंतेची समस्या कायम आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून रेल्वे विभागाचे स्लॅब टाकण्याचे काम सुरु होते. त्यामुळे रात्रीची वाहतूक या रस्त्यावरुन बंद होती. मात्र, पूर्ण क्षमतेने वाहतूक अद्यापही सुरु नसल्याने या मार्गी ये-जा करणारे वाहनधारक हे अतिशय त्रस्त होत आहेत.

सांडपाण्याची स्थिती ‘जैसे थे’
ममुराबाद रस्त्यावरील लेंडीनाल्याचे सांडपाणी हे बांधकाम होत असलेल्या पुलाखाली अद्यापही साचत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या सांडपाण्याचा निचरा करण्याचे काम महानगरपालिकेतर्फेे अद्यापही होत नसल्याचे परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे. या साचत असलेल्या घाण पाण्यामुळे या परिसरात दुर्गंधी सुटते. या पाण्यामुळे रस्त्यावरील वाहनधारकांना सततचा त्रास होत असतो.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!