Type to search

Breaking News Featured जळगाव फिचर्स

आक्षेपार्ह व्हीडीओवरुन समतानगरात तणाव

Share
अपसंपदा प्रकरणी खेडकर दामप्त्यावर गुन्हा दाखल, Latest News Apsampada Action Ahmednagar

जळगाव  –

समतानगर परिसरात सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत  आक्षेपार्ह व्हीडीओ बनवून तो व्हायरल केला.  त्यामुळे दोन गटात तणाव निर्माण झाला होता.  या घटनेबाबत कळताच  रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.

यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात येवून पोलिसांनी जुबेर अकील खाटीक (१८), जाफर शकील खाटीक (२२), अकबर सलीम सैय्यद (१८) व अरबाज शकील सैय्यद (१९, सर्व रा.वंजारी टेकडी, समता नगर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

समतानगरातील चार जणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी टीकटॉक या सोशल मीडियाच्या ऍपवर आक्षेपार्ह व्हीडीओ बनविला. हा व्हीडीओ सोमवारीव्हायरल झाला. शहरातील एका गटाने हा व्हिडीओ पाहिल्यानंतर १० ते १२ जणांचा जमाव समतानगरातील या चारही तरुणांकडे चालून गेला.

अटकसत्र सुरू

या दोन गटातील वाद बघून काही स्थानिक नागरिकांनी रामानंदनगर पोलिसांना कळवले. सहायक फौजदार गोपाळ चौधरी, सतीश डोलारे, महेंद्र पाटील, वासुदेव मोरे आदींचे पथके दोन वाहनातून घटनास्थळी पोहचले. पोलिसांना पाहताच एक गट फरार झाला.

पोलिसांनी धरपकड सुरू केली. पोलिसांनी चौकशी केली असता जुबेर, जाफर, अकबर व अरबाज या चौघांनी आक्षेपार्ह व्हीडीओ बनविल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी  चौकशी करुन त्या तरुणांचे मोबाइल जप्त केले.  चौघांवर धार्मिक भावना भडकावून दोन गटात तेढ निर्माण केला, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!