जळगावातील नूतन मराठा विद्यालयाच्या लिपिकाची आत्महत्या

0
जळगाव । शहरातील रामेश्वर कॉलनी मधील रहिवासी तथा नूतन मराठा महा-विद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या धनराज वाघ (37) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रात्री 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.याबाबत पोलीस व नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, धनराज वाघ हे 2009 पासून नूतन मराठा महाविद्यालयात लिपिक म्हणून कामाला होते.

दरम्यान त्यांची पत्नी रावेर येथे माहेरी गेली होती, त्यामुळे ते घरी एकटेच होते. रात्री त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. त्यानंतर त्याचा लहान भाऊ सोमनाथ घरी आल्यानंतर त्याला धनराजने आत्महत्या केल्याचे दिसून आले.

त्याने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्याला लगेचच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला तपासणीअंती डॉ भोळे यांनी मयत घोषित केले. घटनेची माहिती कळताच महाविद्यालयाच्या कर्मचार्‍यांनी रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टराच्या खबरीवरून एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मयत धनराज याच्या पश्चात पत्नी, दोन मुले,लहान भाऊ असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

*