आव्हान -2017 मध्ये उमविची बाजी

0
जळगाव । दि.22 । प्रतिनिधी-कोल्हापुर शिवाजी विद्यापीठ येथे झालेल्या राज्यस्तरीय चान्सलर ब्रिगेड आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर आव्हान-2017 मध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा कुणाल मानकर हा सर्वोत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक ठरला.
आव्हान 2017 साठी जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थी व संघ व्यवस्थापक असा संघ सहभागी झाला होता.
संघातील स्वयंसेवक धनाजी नाना महाविद्यालयातील कुणाल अर्जुन मानकर आव्हान-2017 मधील सर्वोत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक पुरस्कार प्राप्त झाला असुन संबधितास स्मृतिचिन्ह व विद्यापीठास फिरता चषक प्राप्त झालेला आहे.

राज्यस्तरीय आव्हान 2017 चा दहा दिवसीय शिबीरात उमविच्या संघाने सर्वच क्षेत्रात उत्क्रृष्ट कामगिरी केली. यात जळगाव जिल्हयाचे संघव्यवस्थापक प्रा.साहेब पडलवार जे.डी.एम.व्ही.पी.एस चे महाविद्यालय जळगाव व प्रा.संगीता चंद्रात्रे मु.जे.महाविद्यालय जळगाव यांनी संघ व्यवस्थापक म्हणून उत्कृष्ट कामगिरी करत दोघेही अनुक्रमे राज्यभरात तिसर्‍या क्रमांकावर राहिले.

त्यांच्या यशाबद्दल उमविचे कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील, प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी, विशेष कार्य अधिकारी प्रा.पी.पी.माहुलीकर , वित्त व लेखा अधिकारी डॉ.बी.डी.कर्‍हाड, परीक्षा नियंत्रक डॉ.ध.ना.गुजराथी, प्रा.एस.टी.इंगळे, प्र.संचालक विद्यार्थी विकास व रासेयो तसेच संबधित महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.पी.आर.चौधरी यांनी कौतुक केले आहे.

 

LEAVE A REPLY

*