Type to search

maharashtra जळगाव

शिक्षण विभागाकडून कुलसचिव, प्राचार्याना तंबी

Share
जळगाव । बहिणाबाई विद्यापीठाच्या कक्षेतील जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांनी महाडीबीटी पोर्टलच्या लॉगइनवर शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित ठेवले आहेत. त्यामुळे उच्च शिक्षण सहसंचालकांनी अनेक महाविद्यालयांचे प्राचार्य व विद्यापीठाच्या कुलसचिवांना तंबी दिल्याचे समजते. उच्च शिक्षण संचालनायामार्फत राबविण्यात येणार्‍या शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज 28 फेब्रुवारीच्या आत सादर करा, कुठल्याही परिस्थितीत पोर्टलवर अर्ज प्रलंबित ठेवू नका, अशी ताकीद दिली गेल्याचे समजते.

अर्ज भरण्यासाठी यापूर्वी अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता 28 फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही बहुसंख्य महाविद्यालयांकडून, पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाइन भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देऊनही, अद्यापही योग्य प्रतिसाद मिळालेला नाही. दुसरीकडे, जास्तीत-जास्त महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मुदतीत मिळावा, यासाठी सरकारचा शिक्षण खात्यावर दबाव आहे.

सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना शिष्यवृत्ती व अन्य विविध योजनांची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मंजूर झालेली आहे. या विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती लवकर जमा करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकार आग्रही आहे. मात्र, पोर्टलवर महाविद्यालयांचे लिपीक व प्राचार्यांच्या लॉगइनवर अनेक अर्ज प्रलंबित आहेत.

राज्य शासनाचे मुख्य सचिव व संबंधित विभागाचे सचिव यांच्या स्तरावर सतत आढावा बैठका सुरू आहेत. त्यामुळे महाविद्यालयांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्राधान्याने कार्यवाही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना देण्यात आली आहे. संबंधित महाविद्यालयांनी प्रलंबित अर्जांची तपासणी करून पुढे अर्ज पाठविण्याची आवश्यकता आहे. महाविद्यालयांनी एकही अर्ज प्रलंबित ठेवू नये, असे आदेश बजाविण्यात आलेले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!