Type to search

जळगाव

विधी शाखेमधील विद्यार्थ्यांचे विद्यापीठाच्या इमारतीसमोर आंदोलन

Share

जळगाव । विधी शाखेच्या अभ्यासक्रमाला 35-40 पासिंगचा निकष लावण्यात यावा, या मागणीसाठी जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर शुक्रवारी सकाळी 11 वाजता आंदोलन केल्याने संपूर्ण परिसर दणाणला होता.

विधी शाखेच्या अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झाला अन् त्यात फक्त 3451 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. केवळ 65 टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाली आहे़ विद्यापीठाच्या या सदोष पेपर तपासणीमुळे विद्यार्थ्यांवर अन्याय झाला म्हणून विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता़ म्हणून अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी पंधरा ते वीस दिवसांपूर्वी कुलगुरू डॉ. पी.पी.पाटील यांची भेट घेवून पेपरची फेरतपासणी करून किंवा पासिंग निकष हा 35 गुणांचा, 40 गुणांचा अ‍ॅग्रीगेट असा ठेवावा, अशी मागणी केली होती़ त्यानंतर कुलगुरुंनी सकारात्मक चर्चा करून आश्वासन दिले होते. या आंदोलनात मयुर बैसाने, निशांत शिंपी, कल्पेश तमईचेकर यांच्यासह अनुउत्तीर्ण झालेले विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मागणी मान्य न झाल्याने आंदोलनाचे अस्त्र
विधी अभ्यासक्रमाला 35-40 पासिंगचा निकष लावण्यात यावा, या मागणीची दखल न घेतल्याने तसेच आश्वासनाची अंमलबजावणी न केल्याने जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील विधी अभ्यासक्रमात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी सकाळी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली़

आंदोलन मागे न घेण्याचा घेतला पवित्रा
विद्यार्थ्यांकडून विधी अभ्यासक्रमास 35-40 पासिंगचा निकष लावण्यात यावा या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्यानंतर कुलगुरूंनी विद्यार्थ्यांची भेट घ्यावी अशी मागणी जोर धरू लागली़ कुलगुरू भेटीला न आल्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा घेत जोरदार घोषणाबाजी सुरूच ठेवली व या घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणून गेले़ काही वेळानंतर विद्यापीठातील काही अधिकार्‍यांची त्यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांशी
चर्चा केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!