चिमुकलीवर अत्याचार प्रकरणी दोंडाईचेकर एकवटले

शहरात अभूतपूर्व मुकमोर्चा : अपर तहसिलदार कार्यालयात मोर्चेकरांचा आक्रोश

0

दोंडाईचा ता. २० :  मन सुन्न करणा-या 5 वर्षीय चिमुकलीवर दोंडाईचा येथील ज्ञानोपासक शिक्षण संस्थेच्या नुतन विदयालयात अत्याचार करून ती घटना तब्बल 10 दिवस दडपल्याच्या निषेधार्ष दोंडाईचा शहरात अभूतपूर्व मुकमोर्चा काढण्यात आला.

या मुकमोर्चामध्ये शालेय विदयार्थीनी, महिलांचा मोठा समावेश होता, मोर्चेकरी महिलांनी दोंडाईचा येथील अपर तहसिलदार कार्यालयात आक्रोश करीत आरोपीला आमच्या ताब्यात दया असा आक्रोश करत कारवाई करण्याची विनंती तहसिलदारांना केली.

दरम्यान महिला आयोगाच्या डॉ.देवयानी ठाकरे व अन्य पदाधिकारी आज बुधवारी दि. 21 रोजी दोंडाईचा शहरात येवून सबंधीत शाळेत जावून घटनास्थळी भेट देणार असल्याची माहिती मिळाली आहे.

दोंडाईचा शहरात माजी मंत्री डॉ.हेमंत देशमुख यांच्या शिक्षण संस्थेत दि. 8 फेब्रुवारी रोजी चौकलेटचे आमिष दाखवून 5 वर्षी चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला होता, पीडितेच्या पालकांनी सदर घटनेची संस्थाचालकांना जाणीव करून दिली असताना देखील त्यांनी हे प्रकरण तब्बत 10 दिवस दाबले म्हणून अज्ञात आरोपींसह संस्थाचालक डॉ.हेमंत देशमुख, त्यांचे बंधू डॉ.रविंद्र देशमुख, शिक्षक महेंद्र पाटील, प्रतिक महाले, व नंदू सोनवणे यांच्यावर पीडीतांच्या आईच्या तक्रारीवरून जळगांव पोलिसांत दि. 18 रोजी 376, बाल लैगिंक अत्याचार 2012 कलम 3/4  व 506 अंतर्गत  गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हा जळगांव पोलिसांनी धुळे जिल्हयातील दोंडाईचा पोलिसात शुन्य क्रमांकाने वर्ग केला आहे.

या घटनेच्या निषेधार्थ आज दोडाईचा येथील पीडिता राहत असलेल्या महादेवपुरा परीसरात शहरातील महिला, पुरूष, विदयार्थी, यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिका-यांनी एकत्रित येवून येथील अपर तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढला, या मोर्चाला महादेवपुरा पासून सुरवात होवून राममंदिर, अंजुम रोड, स्टेशन भाग, निर्मल एम्पोरीयम, शिवाजी पुतळा, तेथून संस्थाचालक तथा घटनेचे आरोपी डॉ.हेमंत देशमुख यांच्या निवासस्थानावरून अपर तहसिलदार कार्यालय येथे नेण्यात आला. याठिकाणी अनेक महिलांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

मुकमोर्चा तहसिलदार कार्यालयावर झाला आक्रोश मोर्चा: पीडीतांवर अत्याचार करणा-या नराधमांसह या घटनेला दाबणा-यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी निघालेला मुकमोर्चाचे रूपांतर तहसिलदार कार्यालयात चक्क आक्रोश मोर्चात झाले याठिकाणी महिलांनी जोरदार आक्रोश करीत अत्याचार करणा-यांना आमच्या ताब्यात दया अशी मागणी केली. पोलिसांनी वेळीच सावधगीरी बाळगून परीस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, 2 दिवसात आरोपींना अटक न झाल्यास दोंडाईचा शहर बंद करण्याचा इशारा यावेळी मोर्चेकरांनी दिला.

LEAVE A REPLY

*