Friday, April 26, 2024
Homeजळगावकुंटणखान्यावर पुन्हा धाड

कुंटणखान्यावर पुन्हा धाड

जळगाव 

शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यमुना नगरातील लक्ष्मी पार्क भागामधील कुंटणखान्यावर पोलिसांनी 9 रोजी धाड टाकली. यात 45 वर्षीय कुंटणखाना मालकीण, 27 वर्षीय पीडित तरुणी, दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

एक महिला भाड्याच्या घरात कुंटणखाना चालवित असून ती बाहेरुन महिला आणि मुलींना आणून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करीत आहे, अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी नाईक रामकृष्ण पाटील यांना माहितीची पडताळणी करण्याकामी रवाना केले होते. या माहितीची खात्री झाली.

डॉ.नीलाभ रोहन, बापू रोहोम यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक नीता कायटे, सहाय्यक फौजदार विनयकुमार देसले, रमेश जाधव, हेड कॉन्स्टेबल विजय पाटील, रामकृष्ण पाटील, नरेंद्र वारुळे, महिला हेड कॉन्स्टेबल ललिता सोनवणे, मीनल साकळीकर, छाया मराठे, सुनील दामोदरे, महेश पाटील, अशोक फुसे, महेश महाजन तसेच दोन महिला पंच व पुरुष पंच आदींचे पथक तयार झाले. या पथकाने धाड टाकली. ही महिला गिर्‍हाईक आणणार्‍यास 200 रुपये कमिशन व तिच्या घराचा वापर केल्यास त्या महिलेकडून 400 रुपये घेत होती, अशी माहिती मिळाली.

10 हजार रुपये जप्त
कुंटणखान्यात मालकीण, एक 27 वर्षीय पीडित मुलगी तसेच रामेश्वर कॉलनीतील विश्वकर्मा नगरामधील एक 36 वर्षीय तरुण आणि वाल्मिक नगरातील एका 25 वर्षीय तरुणाला पकडले. 45 वर्षीय महिला ही मालकीण असल्याचे निष्पन्न झाले. तिच्या ताब्यातील 10 हजार 680 रुपये रोख, मोबाइल व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले व या सर्वांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या