रावेरात ट्रकने एकास चिरडले

0

रावेर | दि. ९ | प्रतिनिधी :  सावदयाहून बऱ्हाणपुर येथे नारळ घेऊन जाणाऱ्या ट्रक ने रावेरातील २५ वार्षीय तरुणास चिरडल्याची घटना शनिवारी पहाटे ४.३० वाजता रावेरात घडली. याबाबत रावेर पोलीसात ट्रक चालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कौसर मस्जिद जवळील शाबीर खान हमीदखान (वय २५) हा तरुण सकाळी ४.३० वा. कामावर जात असताना रावेर सावदा रोडवरील बऱ्हाणपुर जिलेबी सेंटर समोर सावदयाकडून नारळ घेऊन जाणाऱ्या ट्रक क्रंमाक एच आर ६९ बी ५६१६ ने शाबीरखान ला मागुन जोरदार धडक दिल्याने यात शाबीरखान यांचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत रावेर पोलीसात आसिफखान अरमानखान यांनी र फिर्याद दिल्यावरुन ट्रकचालक हकीमखान जमालोद्दीन खान रा. जयसिंगपुर जि.लहू ( हरियाणा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत शबीर खान यांच्या पश्चात दोन मुल, पत्नी असा परिवार आहे. मयतावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

*