धुळे दोंडाईचा महामार्गावर अपघात ; ३ ठार

0

महेश पाटील | नंदुरबार :  धुळे-दोंडाईचा महामार्गावर ट्रक व रुग्णवाहीका यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भिषण अपघात यात 3 जण जागीच ठार झाले आहेत.

दोंडाईचा नंदुरबार रस्त्यावर रूग्णवाहीका व खाजगी वाहन मालट्रक यांच्यात अपघात झाला़ यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला़ न्याहाली जवळील धाब्याच्या पुढे ही दुर्घटना घडली़ .

यात रूग्णवाहीकेतील भिकन बापू पवार, अनिल पंडीत गुरव (दोघे रा़ धुळे) आणि अंदरखाँ अब्दुलखाँ मकरानी (रा़ अक्कलकुवा) हे तीन जण जागीच ठार झाले आहेत. रूग्णवाहिका अक्कलकुवा येथील आहे़ ही रुग्णवाहिका नंदुरबार येथून धुळे येथे दुरुस्तीसाठी जात असताना ही घटना घडली़ सुदैवाने यात रुग्ण नव्हते़ .

LEAVE A REPLY

*