Type to search

जळगाव

कोल्हे वाड्यात लक्ष्मीदर्शनानंतर उडाली झुंबड

Share

जळगाव । जुन्या जळगावातील कोल्हे वाड्यात दुपारी 4 वाजेदर्शन लक्ष्मीदर्शन होऊ लागले. त्यामुळे पैशांच्या अपेक्षेतील मतदार मतदानासाठी बाहेर निघू लागले. पैशांसाठी नागरिकांची झुंबड उडाली. याबाबत पोलिसांना कळताच डिवायएसपी निलाभ रोहन व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.

साडेचार वाजेनंतर एका पक्षाचे राजकीय पदाधिकारी पैसे वाटप चर्चेला आणखी उधाण आले. त्यामुळे जुन्या जळगावात बर्‍याच भागात धावपळ झाली. जुन्या जळगावातील मनपा शाळा क्र.22 या मतदान केंद्रावर व कोल्हेवाड्याला पोलिसांच्या छावणीचे स्वरुप आले होते.

शहरातील अनेक परिसरातील श्रमिक भागात लक्ष्मीदर्शनांनतर दुपारी 4 वाजेपासून रांगा लागल्या. राजकीय मंडळी पैसे घेवून येतील, तेव्हाच मतदानासाठी बाहेर निघू, असा ठाम विचार अनेकांनी केलेला होता. त्यामुळे शहरातील हरिविठ्ठलनगर, खंडेरावनगर, पिंप्राळा, हुडको, मेहरुण, तांबापूर, रामेश्वर कॉलनी, सुप्रिम कॉलनी कांचननगर, गोपाळपुरा, जैनाबाद, गेंदालाल मिल आदी भागात दुपारी 4 वाजेनंतर मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी उसळली.

पैसे वाटप करतांना एकास पकडले
पैसे वाटप करतांना एमआयडीसी पोलिसांनी एका बिजेपी कार्यकर्त्यास पकडले असल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून समजते. सायंकाळी 4 ते 4.30 च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. येथील रामेश्वर कॉलनीत गल्लीबोळात एक भाजपा कार्यकर्ता पैसे वाटप करत असतांना आढळून आला आहे. यावेळी त्याचेसोबत दोन इतर कार्यकर्तेही होते. ते कार्यकर्ते पळून गेल्याचे समजते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!