Type to search

जळगाव

जळगावात 45 टक्के मतदान

Share

जळगाव । शहर विधानसभा मतदार संघात आज विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदानाच्या दिवशी सकाळी ढगाळ वातावरणामुळे अल्पसा प्रतिसाद दिसून आला. यात शहरात 9 वाजेपर्यत केवळ सरासरी 2.49 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी अकरा नंतर काही प्रमाणात फरक दिसून आला.

शहरातील 365 मतदान केंद्रासह 29 सहायकारी अशा एकूण 394 मतदान केंद्रांवर आज दि.21 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान प्रकिया पार पडली. यात जळगाव शहर विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार सुरेश भोळे, राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील, मनसेचे अ‍ॅड.जमील देशपांडे, वंदना पाटील यांच्यासह निवडणूक लढविणार्‍या 13 उमेदवारांचे भवितव्य इव्हिएममधे बंद झाले आहे. तर विधानसभा निवडणूकीची मतमोजणी गुरूवार दि.24 रोजी सकाळी 10 वाजेपासून करण्यात येणार आहे.

आधीच झाले मतदान
शिरसोली रोडवरील सेंट जोसेफ विद्यालयात असलेल्या मतदान केंद्रावर मेहरूण परीसरातील रहीवासी असेल्या कांतीलाल भास्कर पाटील आणि सुरेखा कांतीलाल पाटील दाम्पत्य मतदान करण्यासाठी गेले होते. त्यांच्या नावावर अगोदरच मतदान झाले असल्याचे दिसून आले. यासंदर्भात केंद्राध्यक्ष यांचेकडे तक्रार केल्यानंतर यादीत तपासणी करून पाहीले असता मतदार कांतीलाल भास्कर पाटील यांच्या वडीलांचे नाव भास्कर ऐवजी शांतीलाल असे आढळले असून फोटो देखिल चुकीचा नोंदविला आहे.

उमेदवारांसह गणमान्य व्यक्तींचे मतदान
शहर विधानसभा मतदान क्षेत्रात जळगाव शहरात 394 मतदान केंद्र असून जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे गणतीनगर सिंधी समाज हॉल येथे सकाळी 7.30 वाजता तर आ.राजूमामा भोळे, महापौर सीमा भोळे यांनी रत्ना भाभी जैन विद्यालय येथे 7.10 वाजता, उद्योगपती अशोक जैन, आ.चंदूलाल पटेल यांनी एम.जे,कॉलेज परीसरातील परशुराम विठोबा विद्यालय येथे तर ललित कोल्हे यांनी सरस्वती विद्यालय, राष्ट्रवादीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी त्यांच्या आदर्शनगर परीसरातील रूस्तमजी शाळा मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!