Type to search

Breaking News जळगाव मुख्य बातम्या राजकीय

जळगावात टक्का घसरला

Share

जळगाव । जळगाव जिल्ह्यात रात्री 9 वाजेपर्यंत 59.79 टक्के मतदान झाले. पाचोर्‍यात रात्री 9 वाजेनंतरही मतदान सुरू होते. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का घसरला. यावेळी शहरी मतदारांत निरुत्साह तर ग्रामीण मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. सर्वात कमी मतदान जळगाव शहराचे असून सर्वाधिक मतदान रावेरमध्ये झाले. विद्यमान मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे, संजय सावकारे, सुरेश भोळे, शिरीष चौधरी (अमळनेर), डॉ. सतीश पाटील, किशोर पाटील यांच्यासह 100 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. या उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला आता गुुरुवार (ता.24) रोजी होणार आहे.

जिल्ह्यात 11 जागांसाठी 100 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यांचा भवितव्याचा फैसला गुरुवारी होणार आहे. त्यात भाजपाकडून मुक्ताईनगर येथे विद्यमान आमदार एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे, शिवसेनेकडून लताबाई चंद्रकांत सोनवणे यांच्यासह 10 महिला उमेदवार आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघांत 11 मतदान केंद्र हे सखी मतदान केंद्र म्हणून निवडण्यात आले होते.

या सर्व मतदान केंद्रांवर महिला कर्मचारी नियुक्त करण्यात आली होती. या निवडणुकीत मतदान यंत्राला व्हीव्हीपॅट यंत्र जोडण्यात आल्याने मतदाराला आपण केलेल्या उमेदवारालाच मतदान झाल्याचे दिसून येत होते. जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त पोलीस विभागामार्फत ठेवण्यात आला होता.

कमी मतदानाचा फायदा कोणाला?
जळगाव जिल्ह्यात मतदानाची साठीसुद्धा पार झालेली नाही. सरासरी 58 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 2014 मधील निवडणुकीपेक्षा 5 टक्के कमी मतदान आहे. या कमी मतदानाचा फटका कोणाला बसणार? हे गुरुवारीच निश्चित होणार आहे. 2014 मध्ये 11 जागांपैकी 10 ठिकाणी महायुतीचा विजय झाला होता. केवळ पारोळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव उमेदवार निवडून आला होता. साधारणतः घसरलेल्या मतांचा फटका सत्ताधार्‍यांना बसत असल्याचा इतिहास आहे. सत्ताधार्‍यांविरोधात अ‍ॅन्टीइक्बशी असते. त्यामुळे सुशिक्षित मतदार बाहेर पडत नाही. आजच्या टक्केवारीवरुन शहरी मतदार बाहेर पडल्याचे दिसत नाही. यावर्षी निवडणूक आयोग आणि सामाजिक संस्थांकडून मतदार जागृती मोठ्या प्रमाणात करण्यात आली. नवीन मतदारांची नोंदही चांगली झाली, परंतु मतदानाचा टक्का काही वाढला नाही.

आईचा मृतदेह घरात ठेऊन केले मतदान
धरणगाव येथील 70 वर्षीय धुडकाबाई नथ्थू विसावे या महिलेने आपल्या आईचा मृत्यू झालेला असताना तिचा मृतदेह घरात ठेवून मतदानाचा हक्क बजावला. या केंद्रावर प्रा. संजय भावसार हे केंद्राध्यक्ष होते. आधी लगीन कोंडाण्याचे या उक्तीनुसार धुडकाबाईने आपले दुःख बाजूला ठेवत राष्ट्रीय कार्याला प्राधान्य दिले. त्यांचे सर्वांनी कौतुक केले.

14 ईव्हीएमसह सीयू आणि 64 व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड
जिल्हा परिसरात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 27.23 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली होती. दरम्यान जिल्ह्यातील 3,586 मतदान केंद्रांपैकी काही मतदान केंद्रांवर 14 ईव्हीएम, 14 सीयूसह 64 व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड झाले असल्याने मतदान प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या असल्याचे दिसून आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!