Type to search

जळगाव

शासकीय खरेदी केंद्रामार्फत ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया

Share

जळगाव । शासनाकडून जिल्हा परीसरात शासकिय हमीभावानुसार कडधान्य उडीद,मुग, सोयाबीनची खरेदी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी 22 सप्टेबर रोजी सुरू करण्यात आली आहेे. त्यानुसार जिल्हयात शासनाचे हमीदर खरेदी केंद्रे जळगाव जिल्हा कृषि औद्योगीक सर्व सेवा संघ,जळगांव, अमळनेर शेतकी संघ अमळनेर, शेतकी संघ भडगांव असे तीन केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. या केंद्रांवर शेतकर्‍यांनी ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा विपणन अधिकारी यांनी सांगीतले.

शासनाचा हमीदर 5500उडीद, तर मुगासाठी6000 असे जाहिर करण्यात आले आहेत असे असतांना गतवर्षी मूगाची सरासरी खरेदी 3700 ते 4500तर उडीद 4000ते 4500 पर्यत केली जात होती.शासनाकडून सप्टेबरच्या सुरूवातीसच हमीभाव खरेदी केेंद्रे सुरू करण्यात येणे गरजेचे होते. परंतु ते 22 सप्टेबर रोजी सुरू करण्यात आली आहेत. जुन महिन्यात पेरणी योग्य पाउस वेळेवर झालेला नसल्याने कडधान्य बीयाणे पेरणी पाहिजे त्या प्रमाणावर झालेली नाही. पावसाच्या अनिश्चतेमुळे गेल्या दोन तीन वर्षापासून देखिल उडीद, मूगाचे उत्पादनावर परीणाम झाला आहे.यावर्षी शेतकर्‍यांनी सोयाबीन, मका, ज्वारी या वाणावर भर दिला आहे.नवीन उडीद मूगाची आवक बाजार पेठेत बहुतांश ठिकाणी सुरू होते. परंतु यावर्षी केवळ मूगाची आवक वगळता उडीदाची आवक अजून सूरू झालेली नाही.

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गेल्या काही दिवसांत सुमारे 100 क्विंटल मुगाची आवक झालेली असून सरासरी 5500 ते 6000 रुपये असा भाव देण्यात येत आहे. शेतकर्‍यांनी ऑनलाईन नोंदणी करुन मेसेज मिळाल्यानंतरच्या तारखेस आपला शेतमाल भडगाव शेतकी संघ येथे विक्रीस घेवून जावा असे पाचोरा कृऊबास सचिव यांनी सांगितले.

शासनाच्या महाफेडअंतर्गत ऑनलाईन नोंदणी प्रकीया सूरू करण्यात आली आहे. जिल्हयातील अमळनेर, जळगाव, पाचोरा या केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी करतेवेळी शेतकर्‍यांनी ऑनलाईन सातबारा उतारा त्यावर पिकांची नोंदीसह, आधार कार्ड,बॅक खाते पासबुकची झेरॉक्स सह 29 सप्टेबर पर्यत नोंदणी केल्यानंतर शेतकर्‍यांना मेसेज आल्यानंतर दिलेल्या तारखेस शेतमाल खरेदी केंद्रावर आणावा.
-परीमल साळुंखे
जिल्हा विपणन अधिकारी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!