Type to search

जळगाव

हतनूर, गिरणापाठोपाठ वाघूरही फुल्ल

Share

जळगाव । शहरानजीक असलेला वाघूर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात आवक होत असून शंभर टक्के भरला असून आज रविवार सकाळी 678 क्युसेक पाणी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. वाघूर प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने शहरासह तालुका परीसरातील रब्बी पिकासाठी सोय उपलब्ध झाली असल्याने परीसरात समाधान व्यक्त होत आहे. शहराच्या पाणीपुरवठयासह तालुक्याच्या सिंचनासाठी वाघूर प्रकल्पाची उभारणी जामनेर तालुक्यात करण्यात आली. त्याच वर्षी हा प्रकल्प शंभर टक्के भरला होता. या प्रकल्पाची क्षमता 248.55दलघमी असून गतवर्षी सप्टेबरमध्ये केवळ 117.41 दलघमी साठा उपलब्ध होता.

2700 एमएलडी क्षमता
मेहरुण तलाव चार वर्षानंतर पुर्ण क्षमतेने भरला आहे. मेहरुण तलावाचा पाच कि.मी.चा परीघ असून 76.6 हेक्टर तलावाचा परिसर आहे. 2700 एमएलडी जलसाठा क्षमता आहे. मेहरुण तलाव 100 टक्के भरल्याने सांडव्यातून विसर्ग सुरु झाला आहे.

255. दलघमी क्षमता

हतनूर प्रकल्पात आजमितीस 59.61 टक्के उपयुंक्त जलसाठा असून साडव्यांसह 8 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. त्यातुन 69,517 क्यूसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. गेल्यावर्षी याच दिवशी 87.53टक्के उपयुक्त जलसाठा होता.

179.18 दलघमी क्षमता
कांताई बंधारा धानोरा व कढोली परिसरातील गिरणा नदीवर बांधलेला आहे. बंधार्‍याची पाणी क्षमता 179.18 तर पाणलोट क्षेत्र 913.61 चौ.कि.मी. आहे. बंधार्‍याची लांबी गिरणेच्या पात्राप्रमाणे 246 मीटर तर उंची 8.12 मीटर एवढी आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!